काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे आणि
ते पुढे हिंदु राष्ट्रातही रहाणार, हे अब्दुल्ला यांनी लक्षात ठेवावे !
श्रीनगर - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जर भारताला हिंदु राष्ट्र म्हणत असतील, तर आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, काश्मीर हिंदु राष्ट्राचा भाग रहाणार नाही, त्याला वेगळे करण्यात येईल, असे देशद्रोही विधान नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी येथे केले. ते पक्षाच्या बैठकीत बोलत होते. तसेच त्यांनी भागवत यांच्यावर राज्यघटनेच्या विरोधात बोलल्यामुळे कारवाई करण्याची मागणी केली.
मोहन भागवत यांनी नुकतेच जम्मूमध्ये संघ स्वयंसेवकांसमोर बोलतांना ‘भारत हिंदु राष्ट्र आहे; कारण आपले पूर्वज हिंदु होते’, असे विधान केले होते.
अब्दुल्ला यांनी असेही स्पष्ट केले की, काश्मीर कधीही पाकचा भाग बनणार नाही. पाकमध्ये अद्यापही जमीनदारांकडे सर्व संपत्ती आहे आणि गरीब व्यक्तींची स्थिती दयनीय आहे.
Post a Comment