चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-
चांदुरनगरीमध्ये सध्या निवडणुकीचा रंग चढू लागला असून राजकीय वातावरण गुलाबी थंडीत चांगलेच तापले आहे. यंदा नगराध्यक्षपदासाठी तिसरी आघाडी,अपक्ष उमेदवारांमध्ये थेट लढत होणार असल्याचे बोलले जात असून स्वच्छ पाणी, प्रकाशमान पथदिवे व दर्जेदार शिक्षण या मुलभूत गरजाही मागील भाजप, कॉंग्रेस- राष्ट्रवादी नगराध्यक्ष पूर्ण करू न शकल्याने मतदारांमध्ये निराशा दिसून येत असल्यामुळे भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे.
चांदुर रेल्वे नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी होऊ घातलेली निवडणूक आठ दिवसांवर येवून ठेपली असल्याने निवडणूक प्रचाराची रंगत वाढली असून प्रचाराच्या भोंग्यांनी शहर अक्षरश: दणाणून सोडले आहे. शहराचा संपूर्ण विकास व कायापालट करण्यासाठी आमच्या उमेदवारांना निवडून द्या, या आशयाच्या निवेदनाद्वारे शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लोगल्ली उमेदवारांचे भोंगे लावलेले प्रचार वाहने गर्दी करीत आहेत. चौकातील चर्चेमध्ये कोण निवडून येणार आणि कोण सपाटून पडणार याविषयी फैरीवर फैरी झडत आहे. उमेदवार आणि त्यांचे प्रचारक मतदारांच्या घराघरात जावून मते देण्यासाठी विनवणी करीत आहेत. थेट नगराध्यक्ष आणि प्रभाग सदस्यांच्या जागेसाठी चांदर रेल्वेत अटीतटीची लढत होत असून जातीय समिकरणे लावण्यासोबतच कोणता उमेदवार कशा पद्धतीने जिंकणार याविषयी तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. अशातच नगर परिषदेची निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तसतसे मतदारांमध्ये चर्चेला उधान येत आहे. नगराध्यक्ष कसा असावा, याबाबत सर्वत्र चर्चा सुरु असून स्वच्छ पाणी, प्रकाशमान पथदिवे व दर्जेदार शिक्षण एवढी माफक अपेक्षा महिला व पुरुष मतदारांची असल्याची चर्चा आहे. या मुलभूत गरजाही मागील पाच वर्षांत भाजप, कॉंग्रेस- राष्ट्रवादी नगराध्यक्ष पूर्ण करू न शकल्याने मतदारांमध्ये निराशा दिसून येत आहे. त्यामुळे भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी सद्यस्थितीत बॅकफूटवर गेल्याचे चित्र पहावयास मिळत असुन तिसऱ्या आघाडीचे उमेदवार नितीन गवळी, अपक्ष निलेश विश्वकर्मा यांच्यात थेट लढत होणार असल्याचे शहरात बोलले जात आहे. तसेच कधी तळयात, तर कधी मळयात असणारे नंदु खेरडे यांनीही अपक्ष म्हणुन आपली उमेदवारी ठेवली असुन ती भाजपा व काॅंग्रेससाठी दुखणे ठरणारी आहे. यांमध्ये मागिल कार्यकाळ पाहता नितीन गवळींचे पारडे जड असुन सोबतच निलेश विश्वकर्मांही प्रबळ दावेदार आहे. असे असतांना सुध्दा चित्र आठ दिवसांत स्पष्ट होणारच आहे..
कॉंग्रेस पक्षामधील उच्चपदावर काम करीत असतांना सुध्दा श्री निलेश विश्वकर्मां यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांच्या उमेदवारीमुळे कॉंग्रेसच्या मतांचे विभाजन नक्कीच होणार आहे. याचा फटका कॉंग्रेसच्या उमेदवारासोबतच निलेश विश्वकर्मांना बसणार आहे. या दोघांच्याही उमेदवारीमुळे लाभ तिसऱ्यालाच होणार असल्याचेही बोलल्या जात आहे..

विश्वकर्मांच्या बंडखोरीमुळे कॉंग्रेसला नुकसान

Post a Comment