चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )-
येत्या ३० डिसेंबर पर्यंत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपुर्ण चांदुर रेल्वे तालुका हागणदारी मुक्त करावयाचा आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील जनतेने शौचालय बांधकाम करून वापरावे व चांदुर रेल्वे तालुका लवकरच हागणदारी मुक्त झाला तर अमरावती विभागामध्ये प्रथम हागणदारी मुक्त तालुका म्हणुन बहुमान मिळेल असे प्रतिपादन गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाल यांनी केले.
आतापर्यंत चांदुर रेल्वे तालुक्यातील बेसलाईन सर्वेनुसार १६ हजार ६२४ कुटुंब असुन त्यापैकी १३ हजार २६० कुटुंबाकडे शौचालय आहे. व ३ हजार ३६४ कुटुंब आजही उघड्यावर शौचास जातात. यांकरीता डिसेंबर २०१६ अखेर शौचालय बांधकाम करून वापरायची डेडलाईन आहे. त्याकरीता गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाल यांच्या अधिनस्त सर्व विभाग कार्य करीत आहे. लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस म्हणुन १२ हजार रूपये शौचालय बांधकाम करून प्राप्त करता येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरीकांनी शौचालय बांधकाम करून वापरावे असे आवाहन गटविकास अधिकारी यांनी केले आहे..

Post a Comment