चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-
चांदुर रेल्वे नगरपरीषदेच्या अध्यक्षपदासाठी चुरशीची निवडणुक होणार असुन या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, भारतीय जनता पार्टी, तिसरी आघाडी, राष्ट्रवादी पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षसुध्दा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ झाला असतांना तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात बाजी मारली असुन राष्ट्रीय पक्षांची मात्र पिछेहाट झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांनी अन्य पक्षांच्या उमेदवारांपुढे तगडे आव्हान उभे केले आहे.नगर परिषद निवडणूकीची तयारी पूर्ण झाली. अर्ज मागे व चिन्ह वाटप होताच प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होते. अशातच चांदुर रेल्वे नगर परिषदच्या अध्यक्षपदाच्या प्रचाराचा नारळ सर्वच पक्षांनी फोडुन प्रचाराला प्रारंभ केला. मात्र सद्याचे चित्र पाहता तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात बाजी मारल्याचे दिसत असुन राष्ट्रीय पक्षांची मात्र प्रचारात पिछेहाट झाली आहे. प्रचारात युवा वर्ग सर्वांत सक्रिय दिसत आहे. चांदुर रेल्वे शहरात एकुन ८ प्रभाग आहे. यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतुन निवडुन द्यायचा अाहे. प्रचारासाठी कमी वेळ मिळाला असला तरी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना ८ ही प्रभाग पिंजुन काढायचे आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादीचा नगर परीषदमधील मागील कार्यकाळ बघता यावेळेस कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जबर झटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र प्रचार सुरू असतांना प्रचारात तिसरी आघाडीने बाजी मारली ऐवढे मात्र नक्की.
Post a Comment