BREAKING NEWS

Tuesday, November 15, 2016

गदग (कर्नाटक) येथे राष्ट्रोत्थान विद्याकेंद्रांतील पालकांना हिंदु जनजागृती समितीकडून मार्गदर्शन


मार्गदर्शन करतांना सौ. संगीता जानू
आणि उपस्थित पालक
    हजरी बोम्मानहळ्ळी (कर्नाटक) -कर्नाटकच्या गदग जिल्ह्यातील हजरीबोम्मानहळ्ळी येथे राष्ट्रोत्थान विद्याकेंद्रांच्या पालकांसाठी १० आणि ११ नोव्हेंबर असे २ दिवस एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संगीता जानू यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात व्यक्तीमत्त्व विकास, आनंदी जीवनासाठी अध्यात्म, साधना, धर्मशिक्षण यांविषयी माहिती दिली. 
क्षणचित्रे 
१. कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
२. काही महिलांनी धर्मशिक्षणवर्ग आयोजित करण्याची मागणी केली.
३. धर्मशिक्षणातून कुंकू लावण्याचे महत्त्व लक्षात आल्याने दुसर्‍या दिवशी कार्यक्रमाला येतांना १५ महिला टीकली ऐवजी कुंकू लावून आल्या होत्या.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.