दिल्ली - आतंकवादाला खतपाणी घालण्याचा आरोप असलेल्या डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेवर ५ वर्षांची बंदी घातली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बांगलादेश येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी पकडलेल्या २ आतंकवाद्यांनी डॉ. झाकीर यांच्या भाषणांनी प्रभावित होऊन बॉम्बस्फोट केल्याचे सांगितले होते. तसेच डॉ. झाकीर यांच्या संस्थेला मिळणारा पैसा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जातो, अशी माहिती मिळाली होती.
महाराष्ट्राच्या गृहखात्याने केंद्रीय गृहखात्याला डॉ. झाकीर यांच्या संस्थेविषयी माहिती कळवली होती.
हिंदु जनजागृती समितीने राष्ट्रद्रोही डॉ. झाकीर यांच्या विरोधात गेले अनेक वर्षे आंदोलने, पत्रकार परिषदा घेऊन जनजागृती केली होती, तसेच अटक करण्याची मागणी केली होती.

Post a Comment