BREAKING NEWS

Tuesday, November 15, 2016

सप्टेंबर महिन्यात बँकांमध्ये जमा झालेले ६ लक्ष कोटी कोणाचे ? - काँग्रेसचा केंद्र सरकारला प्रश्‍न

दिल्ली - सप्टेंबर २०१६ या महिन्यात देशातील विविध बँकांमध्ये ५ लक्ष ८८ हजार  ६०० कोटी रुपये जमा करण्यात आले. यातून ५०० आणि १ हजार  रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याच्या निर्णयाची पूर्वसूचना केंद्र सरकारने भाजप तसेच त्याच्या विश्‍वासातील लोकांना दिल्यामुळेच ही वाढ झाली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच गेल्या ६ मासांतील भाजपचे ६ नोव्हेंबरपर्यंतचे सारे बँक व्यवहार उघड करण्यात यावेत, अशी मागणीही काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. 
     स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा घोटाळा असल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनीही केला आहे. संयुक्त संसदीय समिती स्थापन करून कोणाच्या खात्यात किती पैसा जमा झाला याची चौकशी करण्याची मागणी संसदेत काँग्रेस करेल, असे काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी सांगितले. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.