BREAKING NEWS

Tuesday, December 6, 2016

मुख्यालयी न राहणारे व दांडी बहाद्दर 7 अधिकारी ,कर्मचारी निलंबीत

परभणी  / प्रतिनिधी / मोईन खान -- 
Image result for headquarters logo

 तालूका  मुख्यालयी न राहता, अपडाऊन करणारे व विना परवानगी दांडी मारणारे जिल्ह्यातील सहा कर्मचारी व एक अधिकारी यांना जिल्हाधिकारी परभणी यांनी निलंबीत केले असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव भगवान सहाय यांनी दिली आहे ........ मुख्यालयी न राहणे,  वेळेवर कार्यालयात न येणे, कार्यालयाची वेळ संपण्यापुर्वीच निघून जाणे , वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून विना परवानगीच दांड्या मारणे, असे व इतर प्रकार अधिकारी व कर्मचारी संगनमतांनी करीत असल्याने विविध वृतपत्रांनी आवाज उठवून कार्यालयीन शिस्त राहण्यासोबतच ग्रामीण भागातील जनतेला होत असलेल्या अडचणी दुर करण्यासाठी वेळोवेळी लिखाण केले होते परंतु जिल्ह्यातील जवळपास सर्वच यंत्रणांनी त्या कडे सोईस्कररित्या दुर्लक्ष केले होते, परंतु  जनतेच्या हितासाठी वृतपत्रांची आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दखल घेत, सर्व वृतपत्रांच्या कात्रणांसह थेट प्रधान सचिवांकडेच लेखी तक्रार नोंदवली होती , वरील सर्व प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष घालुन , नागरिकांच्या सेवेसाठी अधिकारी व कर्मचारी यांना . कार्यालयीन शिस्त व नियमांचे पालन करण्याबाबत सुचना कराव्यात असे स्पष्ट केले होते , सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी परभणी यांना आदेशीत केल्याने तसे 6 कर्मचारी व अधिकारी त्या दरम्यान कार्यालयीन वेळा न पाळता, मुख्यालयी राहत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले , त्या वरून त्यांनी अशा अधिकारी व कर्मचारी यांना निलंबीत केले असल्याची माहिती प्रधान सचिवांनी आमदार दुर्राणींना लेखी पत्राद्वारे कळवली आहे .......... जिल्ह्यातील विविध अशा 25 ते 30 विभागात करणारे  तालुका व ग्रामीण भागात न राहणारे , वेळेवर कार्यालयात न येता वेळेपुर्वीच निघुन जाणारे , एकमेकांना मदत करून वरीष्ठांच्या परवानगी शिवाय दांड्या मारणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबत तक्रारी असल्यास नागरीकांनी प्रधान सचिव , सामान्य प्रशासन विभाग कक्ष क्रमांक 631 मंत्रालय ( विस्तार) मुंबई 32 यांच्या कडे लेखी स्वरूपात तक्रारी नोंदवील्यास त्याची दखल घेउन कारवाई करण्यात येईल , अशी माहितीही आमदार बाबाजानी यांना दिली असल्याचे आमदार बाबाजानी यांनी सांगितले , थेट प्रधान सचिवांनीच लक्ष घातल्याने आता जिल्ह्यातील सर्वच विभागांच्या कार्यालयांना शिस्त लागेल ,व जनतेला  शासकीय सेवांचा मिळेल , असा विश्वास आमदार बाबाजानी यांनी व्यक्त केला आहे ,

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.