चंद्रकांत जगधने / हवेली /-
परिसरातील बिडी कामगार वसाहत या भागात कचरा, घाण, दुर्गंधीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.या घाणीमुळे डास,चिलटं इ. कीटकांचा त्रास होत असून त्यामुळे डेंगू, मलेरिया सारखे आजार वाढीस लागले आहेत.भागामध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या कारणाने जवळच असलेल्या सुंदराबाई शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. संबंधीत भागातील लोकप्रतिनिधीनकडे निवेदन करूनही ते दुर्लक्ष करत आहेत असे शाळेतील शिक्षकांकडून समजले.
याशिवाय भागामध्ये पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकीही या समस्येतून सुटलेली नाहीये .या टाकीतून जवळपासच्या भागातील हजारो नागरिकांना पाणीपुरवठा होतो.पसरलेल्या घाणीमधून पाईप लाइन व व्हॉल्व्ह जात असल्याने दूषित व गढूळ पाण्याची समस्या निर्माण होत आहे.
या प्रकारे दूषित पाणी, दुर्गंधी, घाण, डास, चिलटं, या सर्वामुळे शाळेतील विद्यार्थी व परिसरातील नागरिक यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.साचलेला कचरा व घाण यांची वेळोवेळी विल्हेवाट न लावल्याने हा प्रश्न निर्माण झाला असून हा कचरा ताबडतोब हटवून ही समस्या त्वरित दूर करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. यापूर्वी वारंवार निवेदन देऊनही ही समस्या दूर झालेली नाही.शिवाय प्रभागक्रमांक रचनेत बदल झाल्याने लोकप्रतिनिधी व प्रशासक याकडे दुर्लक्ष करत आहेत.
तरी या समस्येवर त्वरित मार्ग काढून कचरा व घाणीची ताबडतोब विल्हेवाट लावावी, नागरिकांच्या आरोग्यास होत असलेला धोका हटवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन सातपुते यांनी दिला आहे.

Post a Comment