BREAKING NEWS

Tuesday, December 6, 2016

  मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न  

चंद्रकांत जगधने / हवेली /-, 

      


  समाजातील गोरगरीब व गरजवंत नागरिकांसाठी शिवसेनेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.परिसरातील बिडीकामगार वसाहत येथे हे शिबीर संपन्न झाले. शिवसेना नेते आबासाहेब निकम यांच्यातर्फे शिबीर घेण्यात आले.या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, सल्ला व औषध वाटप करण्यात आले.

             आजकालच्या महागाई मुळे भरपूर नागरिकांना आरोग्य तपासणी,महागडी औषधे यांचा खर्च करणे शक्य नसते. त्यामुळे त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ही समस्या लक्षात घेऊन  शिवसेना, अखिल नवरात्र उत्सव मित्रमंडळ,अखिल विडीकामगार मित्रमंडळ, शिवगर्जना प्रतिष्ठान यांनी हे शिबीर भरवले. या शिबिरात ब्लड शुगर,ब्लड, डोळे, रक्तदाब, अस्थमा इत्यादी प्रकारच्या तपासणी करण्यात आली.तसेच मोफत चष्मा वाटपही करण्यात आले. शिबिराचा जवळपास १५०० नागरिकांनी फायदा घेतला. तर ७०० नागरिकांना चष्मा वाटप करण्यात आले.

            यावेळी सचिन भगत,राजु सावंत, विनोद पऱ्हाड, विनोद करताल, महात्माराम धुमाळ, कैलास पठारे, सुरेश शेजवळ, ज्योती जावळकर, साधना भगत,अमृता पठारे, बबलू कुंदराम, सुरेश आल्हाट, गणेश साबळे, सुनील भगत,भीमराव खरात,पिसे सर,सुनील थोरात,आशिष गोयल, कुणाल मोरे,नितीन भुजबळ,राजाभाऊ चौधरी उपस्थित होते. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.