मोईन खान/
परभणी / प्रतिनिधी-
पुन्हा एकदा सा.बा. विभागाचा मनमानी कारभार समोर आलाय .
सार्वजनिक बांधकाम विभागाने 2013 पासून फुटकळ गुत्तेदारांचे देयके अदा केलेली नाहीत. त्यामुळे संबंधीतांवर उपासमारीची वेळ आल्याने या विरोधात रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष काझी रफियोद्दीन यांनी 30 नोव्हेंबरपासून सा.बां. च्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना 21 नोव्हेंबर रोजी मागणीचे निवेदन देण्यात आले होते. त्यावर अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नसल्याने काझी रफियोद्दीन यांनी परभणीतील शनिवार बाजार, विश्रामगृह परिसरातील सा.बां. विभाग कार्यालयासमोर उपोषण सुरू केेले आहे. 2013,2014 व 2015 या तीन वर्षात रंगरंगोटी, सुरक्षा भिंत, इमारत दुरूस्तीची कामे सा.बां. विभागाने करून घेतली आहेत. परंतु त्याची देयके अद्याप मिळालेली नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. यापुर्वी परभणीत काम केलेेले कार्यकारी अभियंता संजय सोनलकर, एस.ए. देशपांडे यांची सीबीआय मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत आहे.

Post a Comment