BREAKING NEWS

Thursday, December 1, 2016

सक्षम अपंग संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी उपोषण

मोईन खान/
परभणी / प्रतिनिधी-


अपंगांच्या विविध मागण्यांसाठी 1 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सक्षम अपंग संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले.

3 डिसेंबर रोजी जागतीक स्तरावर अपंग दिन साजरा केला जाणार असून या दिवसापर्यंत विविध मागण्यांची पुर्तता करावी अशी अपेक्षा प्रशासनाकडून संघटनेने व्यक्‍त केली आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. वांगी रोडवरील रेशन दुकानदाराने राजीनामा दिल्याने ते शासन निर्णयानूसार अपंगांच्या बचत गटाला द्यावे, बी.पी.एल. शिधापत्रिकेसाठी 27 ऑक्टोंबर 2005 पासून अपंगांचे प्रलंबीत असलेले अर्ज तात्काळ निकाली काढावेत. अपंगांसाठी संजय गांधी निराधार योजनेची 21 हजार रूपये उत्पन्नाचे अट रद्द करून तिच्यात वाढ करावी, सरकारी गाळ्यांमध्ये अपंगांना असलेला 3 टक्के आरक्षणाचा शासन आदेश परभणीत अंमलात आणावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर सक्षम अपंग संघटनेचे मार्गदर्शक किर्तीकुमार बुरांडे, अध्यक्ष संजय वाघमारे, सचिव सुनिल लहाने यांच्या सह्या आहेत. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.