मोईन खान/
परभणी /:
येथील महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रभाग क्र. ११ आणि प्रभाग क्र.२७ या भागात आज बुधवारी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
सदर स्वच्छता मोहिमे अंतर्गत प्रभाग क्र.११ मध्ये दत्तनगर, जिंतूररोड या भागात उपमहापौर भगवान वाघमारे, अतिरिक्त आयुक्त ए.वाय.कारचे, सहा.आयुक्त सय्यद इम्रान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा स्वच्छता कार्यक्रम पार पडला. यावेळी मनपाच्या ३० ते ४० कर्मचार्यांनी परिसरात स्वच्छता करून रस्ते चकाचक केले. या प्रमाणेच प्रभाग क्र. २७ मधील क्रांती चौक आणि भाजी मंडई परिसरात स्वच्छता निरिक्षक करण गायकवाड, मेहराज अहेमद, सुनिल वसमतकर यांच्या सह सङ्गाई कामगारांनी स्वच्छता मोहिम राबविली. या ठिकाणचे रस्ते स्वच्छ करून नाल्या उपसन्यात आल्या. शिवाय परिसरातील व्यापार्यांना कचरा टाकण्यासाठी डसबिन ठेवणे बंधनकारक केले आहे. डसबिन न आढळल्यास ५०० ते १००० रूपयांचा दंड ठोठावण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त कारचे यांनी दिला आहे. दरम्यान यावेळी प्रभाग क्र. अ आणि ब अंतर्गतच्या ५०० व्यापार्यांना या संदर्भात नोटीस देखील बजावण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये डसबिन नसल्याचे निदर्शनास आल्याने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तथापी मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment