BREAKING NEWS

Wednesday, December 14, 2016

आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या दिल्ली आंदोलन ची फलश्रुती

 अचलपूर / प्रमद नैकेले /--



दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळवून देणारं विधेयक आज राज्यसभेत मंजूर झालं आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन संपण्याच्या तीन दिवस आधी दिव्यांग विधेयक 2014 मध्ये आवश्यक बदल करुन मंजूर करण्यात आलं.

हे विधेयक मंजूर झाल्याने देशातील 7 ते 10 कोटी दिव्यांगांना फायदा होणार आहे. नवं विधेयक जुन्या दिव्यांग कायदा, 1995 ची जागा घेईल. या विधेयकामुळे दिव्यांगाना त्यांचे मूलभूत अधिकार सुरक्षित होतील, अशी अपेक्षा आहे.

या अधिवेशनात राज्यसभेत मंजूर झालेलं पहिलंच विधेयक आहे.

विधेयक मंजूर झाल्याचे फायदे
– दिव्यांगांचं नोकरीतलं आरक्षण 3 वरुन 4 टक्क्यांवर

– दिव्यांगांशी भेदभाव केल्यास 10 हजार ते 5 लाखांचा दंड, दोन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो

– दिव्यांगांच्या लाभासाठीच्या कॅटेगरी 7 वरुन 21 वर वाढवल्या

– खासगी कंपन्यांच्या इमारतींमध्ये दिव्यांगाना येण्या-जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन द्याव्या लागतील.

– नवीन कॅटेगरीत अॅसिड अटॅक व्हिक्टिम्स, पार्किन्सन डिसीज, ड्वॉरफिजम यांचा समावेश

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.