"लोकमत" सारख्या जबाबदार वर्तमानपत्राने जराशी गंमत म्हणत जगदगुरू तुकाराम महाराजांचा आणि तुकोबांच्या गाथेतील अभंगांचा अपमान केला होता . दिनांक १७ च्या संपादकीय संपूर्ण आवृत्ती मध्ये लोकमत ने जगदगुरू तुकाराम महाराजांचा एका अभंगाचा गम्मत म्हणून वापर केला याच संदर्भात सोशल मिडिया वर मोठ्या प्रमाणात या गम्मत म्हणून टाकलेल्या अभंगाचा निषेध केल्या गेला होता . जगदगुरू तुकाराम महाराज यांचा एका एका अभंगावर लोक पी.एच.डी. करत आहेत आणि इकडे महाराष्ट्रात व पुण्यात एक नंबर अशा पाट्या लावणारे वर्तमानपत्र तुकोबांची क्रुर चेष्टा केली मात्र आता आजचा संपूर्ण महाराष्ट्रातील आवृत्तीचा मुख्य पहिल्या पानावर लोकमत समूहाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली .
पहा काय म्हटले लोकमत ने
शनिवार 17 डिसेंबर च्या लोकमतच्या संपादकीय पानावर "जराशी गंमत" समाजमाध्यमांची या सदरांतर्गत प्रसिद्ध मजकुराद्वारे जगतगुरू तुकाराम महाराज यांची बदनामी किवा अवहेलना करण्याचा कोणताही हेतू न्हवता . परंतु या मजकुराद्वारे वारकरी समाज तसेच आणखीही मोठा वर्ग कष्टी आणि संतप्त झाल्याचे त्यांनी कळविले आहे त्याबद्दल आम्ही दिलगिर आहोत - संपादक -लोकमत
Post a Comment