सामाजिक अंकेक्षण संचालनालय यांनी केले २० ग्रा.पं.चे अंकेक्षण
चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-
सामाजिक अंकेक्षण संचालनालय यांनी केलेल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील २० ग्रा.पं.च्या अंकेक्षणावर जनसुनवाई घेण्यात आली. या जनसुनवाईत अनेक कामाचे पितळ उघडे पडले.
सामाजिक अंकेक्षण संचालनालय च्या वतीने चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी बुजरूक, राजना, बागापुर, धनोडी, सुपलवाडा, येरड बाजार, सावंगी मग्रापुर, सावंगी संगम, मांजरखेड कसबा, भिलटेक, निंभा, बोरी, चिरोडी, पळसखेड, कवठा कडु, दहेगाव धावडे, टेंभूर्णी, अमदोरी, चांदूरवाडी या २० गावात शासकिय स्तरावरून करण्यात आलेल्या विविध कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यात आले. सामाजिक अंकेक्षण संचालनालयाच्या कर्मचार्यांनी गावात प्रत्यक्ष फिरून व गावकऱ्यांशी संवाद साधुन कामाचे सामाजिक अंकेक्षण केले.त्यात अनेक गावात करण्यात आलेल्या कामात अनियमीतता आढळली. ग्रामसेवक व रोजगार सेवकांनी चक्क कामावर नसणार्यांचा नावाने मस्टर भरले व परस्पर पेमेंट उचलण्याचे उघड झाले. तर चिरोडी येथे सामाजिक वनीकरण विभागाने एकाच मजुराना तब्बल तीन वर्ष सतत काम देऊन मग्रारोहयोच्या नियमांची धज्जीया उडविली. अनेक ग्र्रामसेवकांनी मजुरांना जॉबकार्डचे वाटप केले नसल्याचे निष्पन्न झाले. तर अनेकांना जॉब कॉर्डचे अर्ज कशा प्रकारे भरायचे यांची माहिती नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. गाव समस्यावर गावकऱ्यांनीविचारलेल्या प्रश्नाना शासकिय कर्मचारी समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाही. धडक सिंचन विहिर योजनेत व खचलेल्या विहिरींची दुरूस्तीत अनियमीपणा आढळली. जनसुनवाईला डेप्युटी सि.ओ.सानप, श्री जवंजाळ, जिल्हा तक्रार निवारण केंद्राचे श्री.दुबे, चांदूर रेल्वे तहसीलदार बी.ए.राजगडकर, नायब तहसीलदार दिनेश बढीये, गटविकास अधिकारी अमोल अंदेलवाड, सहाय्यक बिडीओ सोनाली माडकर व सामाजिक अंकेक्षण संचालनालयाचे चेतना लाटकर उपस्थित होते.तर जनसुनवाईला चांदूर तालुक्यातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनसुनवाईबाबत अधिकारी उदासीन

Post a Comment