BREAKING NEWS

Monday, December 19, 2016

तुळजापुरजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात - एक ठार तर एक जखमी - एक सुदैवाने बचावला

चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)



चांदुर रेल्वे- धामणगाव रेल्वे धामणगाव मार्गावरील तुळजापुरजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत एकाचा मृत्यु तर एक जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली.
    प्राप्तमाहिनुसार चांदुर रेल्वेवरून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या तुळजापुर येथील वळणावर धामणगाव रेल्वे येथुन बजाज चैंपियन एमएच २७ जी ९७६२ या दुचाकीने कल्यान नगर अमरावती येथील रीतेश गुप्ता (वय- ४०) व त्यांचा मित्र इरफान टेलर हे अमरावतीकडे येत असतांना तर अंकुश सुधाकर बनसोड (वय- ३०) हे बजाज डिस्कव्हर एमएच ३२ डब्लु ४५८१ ने चांदुर रेल्वे वरून तुळजापुरला जात असतांना या दोन दुचाकीत एवढी गंभीर धडक झाली की त्यात गाडी चालवत असलेले रीतेश गुप्ता यांचा जागीच मृत्यु झाला. तसेच त्याच दुचाकीवर मागे बसलेले इरफान टेलर यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. तर दुसऱ्या दुचाकीवरील अंकुश बनसोड हे गंभीर जखमी  झाले असुन त्यांना शासकीय १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने तातडीने अमरावती येथील रूग्णालयात उपराचार्थ नेण्यात आले. मृतक गुप्ता यांचे पार्थीव स्थानिक रूग्णालयात आणण्यात आले. घटनेची माहीती मिळताच ठाणेदार मानकर यांनी घटनास्थळी धाव घेवुन पुढील कारवाई प्रक्रीया सुरू केली होती..

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.