डबेवाडी (जिल्हा
सातारा) येथे हिंदु धर्मजागृती सभा
![]() |
मार्गदर्शन करतांना सौ. विद्या कदम |
श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून धर्मसभेला प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते वक्त्यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कु. प्रियांका साळुंखे यांनी केले. समितीच्या कार्याची ओळख श्री. वैभव क्षीरसागर यांनी करून दिली. डबेवाडी आणि पंचक्रोशीतील १०० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी सभेचा लाभ घेतला.
हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या कार्यात सक्रीय
सहभाग घ्या ! - श्री. राहुल कोल्हापुरे, सनातन संस्था
धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना हाच अन्याय व्यवस्थेला खरा पर्याय आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी जात-पात, संप्रदाय, पद, पक्ष विसरून केवळ हिंदु म्हणून संघटित व्हावे आणि हिंदु राष्ट्राच्या कार्यात सक्रीय सहभाग घ्यावा ! महत्त्वाचे - या सभेच्या आदल्या दिवशी पोलिसांनी आयोजकांना विवादास्पद वक्तव्ये न करण्याविषयी सूचना केल्या होत्या.

Post a Comment