मर्दानी खेळ, अफझलखान वधाचे पथनाट्य आणि व्याख्याने यांतून जागवले धर्मतेज !
![]() |
| कोपरखैरणे |
![]() |
| लोअर परळ |
मुंबई- ‘अफझलखान वध’ हा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा प्रसंग आहे. आतंकवाद कसा संपवावा, हे या प्रसंगातून शिवरायांनी प्रत्यक्ष कृतीतून जगाला दाखवले; मात्र अल्पसंख्याकांच्या धार्मिक भावना जपण्यासाठी राज्यातील यापूर्वीच्या पुरोगामी सरकारने या ऐतिहासिक प्रसंगाला विद्यार्थ्यांच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून हद्दपार केले. येणार्या पिढीला कदाचित या प्रसंगाची माहितीही नसेल. शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाची आठवण सदैव रहावी, यासाठी गेल्या ४ वर्षांपासून ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संघटनेकडून मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमीला शिवप्रतापदिन साजरा केला जातो. यावर्षीही मुंबईतील लोअर परळ, दहिसर आणि नवी मुंबईतील कोपरखैरणे या ठिकाणी शिवप्रताप दिनानिमित्त मर्दानी खेळ, व्याख्याने आणि अफझलखान वधाचे पथनाट्य सादर करण्यात आले.


Post a Comment