BREAKING NEWS

Thursday, December 8, 2016

मुंबई पोलीस कायद्यान्वये निर्बंध आदेश लागू

मोईन खान / परभणी :-


 जिल्ह्यात ईद-ए-मिलाद तसेच अन्य कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कलम ३६ मुंबई पोलीस कायद्यान्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार परंतु कलम ३३ अन्वये केलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा आदेशाचे उल्लंघन होणार नाही अशारितीने खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे.

      १५ डिसेंबर २०१६ पावेतो परभणी जिल्ह्यात सर्व ठाणे स्वाधीन अंमलदार किंवा वरिष्ठ अधिकारी यांना मुंबई पोलीस कायदा कलम ३६ मध्ये पोटकलम क, ख, ग, ड १. (ड) (च) प्रमाणे खालील बाबतीत लेखी किंवा तोंडी आदेश आपआपले हद्दीत देण्याचे अधिकार राहतील.

      रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणार्‍या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे किंवा त्यांची वर्तणुक किंवा वागणुक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे.

अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत, असे मार्ग व अशा वेळा विहीत करणे.

      सर्व मिरवणुकींच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या सर्व जागांच्या आसपास उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्वप्रसंगी अडथळा होऊ न देणे.

      सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, जत्रा, देवळे आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे.

      कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्याचे किंवा गाणी गाण्याचे किंवा ढोल, ताशे व इतर वाद्य वाजविण्याचे आणि शिंगे व इतर कर्कश वाद्य वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.

१. (डक) कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकांचा उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.)

      सक्षम प्राधिकार्‍याचे या अधिनियमाची कलमे ३३, ३५, ३७ ते ४०, ४२, ४३ व ४५ या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे. असे निर्देशित करण्यात आले आहे की, कोणत्याही इसमाने अगर सदर आदेश लागु असे पर्यंत परभणी जिल्ह्यात जाहीर सभा, पदयात्रा इ. कार्यक्रमासंबंधी पोलीस अधिकारी व त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकार्‍याकडून तारीख, वेळ, सभेची जागा, मिरवणुकीचा मार्ग त्यात दिल्या जाणार्‍या घोषणा निश्‍चित केल्याशिवाय आयोजित करू नये. तसेच संबंधीत पोलीस अधिकारी यांचे आदेशाचे पालन करावे. जाहीर सभा, मिरवणुका, पदयात्रा, मोर्चा यात संयोजित घोषणा सोडून ज्या घोषणेत शांतता व धार्मिक कार्यक्रमास लागु नाहीत. कोणी वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास तो मुंबई पोलीस कायदा कलम १३४ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. हा आदेश संपूर्ण परभणी जिल्ह्यात १५ डिसेंबर २०१६ पावेतो लागु राहील.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.