बुलडाणा (दयालसिंग चव्हाण ):-
संग्रामपूर तालुका भारतीय जनता पक्षाचे वतीने केंद्र व राज्य शासनाच्या वचनपुर्ति सोहळा निमित्ताने आयोजित भूमी पुजन जलाभिषेक कार्यक्रमाचा आनंद उत्सव वरवट बकाल येथेसाजरा करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी चे वतीने मागील निवडणुकीच्या जाहिरनाम्यात जनतेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आंतरराष्टीय शिवस्मारक अरबी समुद्रा मध्ये निर्माण करण्याचे शब्द दिले होते .24 डिसेबर रोजी मुंबई येथील अरबी समुद्रात भूमिपूजन व जलपुजन करून जनतेला दिलेला शब्द पाळला. त्यानिमित्त संग्रामपुर तालुक्यातील वरवट बकाल येथे सुद्धा भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉ गणेश दातीर यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी वरवट बकाल बस स्थानक चौकात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुण आनंदोत्सव साजरा केला .ह्यावेळी भापजा पदाधिकारीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment