BREAKING NEWS

Thursday, December 29, 2016

सनबर्न हा अश्‍लीलतेचा महोत्सव ! – सौ. शुभांगी आफळे



राजकीय पाठिंबा असल्याशिवाय सनबर्नसारखे कार्यक्रम पार पडू शकत नाहीत. सनबर्न हा अश्‍लीलतेचा महोत्सव आहे, अशा शब्दांत सौ. शुभांगी आफळे यांनी  कार्यक्रमावर टीका केली.
स्थानिक ग्रामस्थांना डीजेची अनुमती नसतांनाही सनबर्नच्या आयोजकांना प्रचंड मोठ्या क्षमतेचे डीजे लावण्याची अनुमती कशी दिली जात आहे ? असा प्रश्‍न उपस्थित करत श्री. गणेश काळभोर यांनी धनदांडग्या सनबर्नसाठी पोलीस-प्रशासन कसे झुकत आहे, हे दाखवून दिले. अधिवक्ता मोहनराव डोंगरे यांनीही पुण्यात असे कार्यक्रम होणे लांच्छनास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
विमानतळ परिसरात प्रखर किरणांचा वापर पूर्णतः अवैध !
विमानतळ परिसरात प्रखर किरणांचा वापर करणे पूर्णतः अवैध आहे. सनबर्नच्या आयोजकांनी कार्यक्रमाच्या अनुमतीसाठी एटीसी विभागाची (एअर ट्रॅफिक कंट्रोलची) अनुमती घेतलेली नाही, असे विंग कमांडर संजय शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. मग ही गंभीर गोष्ट विचारात घेऊन सनबर्नचे आयोजक कार्यक्रमामध्ये प्रखर किरणांचा वापर करणे टाळणार का ?, असा प्रश्‍न श्री. अभय वर्तक यांनी उपस्थित केला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.