अनिल चौधरी :
पुणे : -
मैत्री फाउंडेशन व सिंहगर्जना तरुण मंडळ हे नेहमी सामजिक ,शैक्षणिक तसेच नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवीत असतात त्यामुळे मैत्री व सिंहगर्जनेचे काम कौतुकास्पद आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते सुनील कामठे यांनी रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.
मैत्री फाउंडेशन व सिंहगर्जना तरुण मंडळाच्या वतीने फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास गणपतराव कामठे यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढवा बुद्रुक येथे कमाण्ड हॉस्पीटलच्या सौजन्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन आमदार योगेश टिळेकरव सुनील कामठे यांच्या हस्ते करण्यात आले.
रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी युवकांनी स्वता:हूनरक्तदान केले .तसेच काही युवकांनी दर महिन्याला रक्तदानाचा संकल्प केला आहे. या शिबीरात 110 जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमासाठी मा. विरोधी पक्षनेते वसंत मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिशजी गोवेकर, किरण पावसे, जगदीश राऊत, विकासनाना फाटे , नगरसेविका संगिताताई ठोसर, जि.प.सदस्य.दशरथ काळभोर, कृष्णा लोहकरे, गंगाधर बधे,इसाक पानसरे, सुनिल कामठे, सौ.वृषाली सुनिल कामठे, प्रसाद बाबर, गणेश कामठे,पोपटराव लोणकर,राजेंद्र कामठे पाटील,किशोर कामठे, महेश कामठे,स्वप्नील शेलार,काशिनाथआबा काशिद,निलेश धांडेकर, मधुकर धांडेकर,भानुदास कामठे,कैलासराव बधे, प्रमोद दरेकर, रमेश गायकवाड,मधुकर मरळ, सारिका विकासनाना फाटे, गोपीनाथ का मठे, गणेश धांडेकर, संदीप बधे,चंद्रकांत गायकवाड ,दीपक कामठे आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच महिलांची उपस्थिती देखील मोठ्या प्रमाणात होती . याप्रंगी महिलांनी देखीलअतिशय उत्साहाने रक्तदान केले. सिंहगर्जना मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन केलेतर आभार कैलास कामठे यांनी मानले.


Post a Comment