BREAKING NEWS

Friday, December 16, 2016

कोल्हापूर येथील मोर्च्यात पाकचा ध्वज घेऊन सहभागी असणार्‍यांवर कारवाई करा ! - शिवसेना

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करतांना शिवसैनिक
     कोल्हापूर - १४ डिसेंबर या दिवशी कोल्हापुरात काढण्यात आलेल्या मोर्च्यात सहभागी असलेली एक व्यक्ती पाकिस्तानी ध्वज घेऊन फिरत होती. यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था यांचा भंग होऊ शकतो, तरी अशा समाजकंटकावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनाप्रमुख श्री. संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली. 
या वेळी सर्वश्री सुजीत चव्हाण, बाजीराव पाटील, विराज पाटील, करवीर तालुका प्रमुख श्री. राजू यादव, विनोद खोत, सुधीर राणे, राजू सांगावकर, सौ. शुभांगी पोवार, सुजाता सोहनी, सौ. रिया पाटील, सौ. दीपा शिंदे यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदरच्या निवेदनावर जिल्हाप्रमुख श्री. विजय देवणे, शहरप्रमुख श्री. शिवाजीराव जाधव आणि श्री. दुर्गेश लिंग्रस यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. श्री. संजय पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सतत भारत विरोधी कृती करून देशातील शांतता भंग करण्याचा रडीचा पाकिस्तान नेहमी खेळत असतो. अशा प्रकारे पाकिस्तानी ध्वज घेऊन कोल्हापुरातील सलोख्याचे वातावरण जाणीवपूर्वक बिघडवणार्‍या या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.