BREAKING NEWS

Monday, December 5, 2016

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तीर्थक्षेत्र रिद्धपुरला २६९ कोटीची भेट.


मुख्यमंत्री फडणवीस यांचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी मानले आभार 




नागपूर : मोर्शी, वरुड, शेंदूरजनाघाट येथे नुकत्याच पार पडलेल्या नगर पालिका निवडणूकीमध्ये जनतेने भाजपाला घवघवीत यश संपादन करून दिले आहे. मोर्शी – वरुड – शेंदूरजनाघाट परीसराचा विकास करण्याकरिता सिमेंट क्राक्रीट बांधण्यात येणारया रस्ते व पूल यांच्या बांधकाम प्रकल्पासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महानुभवाची काशी म्हणून प्रशिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र रिद्धपूरच्या विकासाकरिता २६९ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याबद्दल आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी सवश्री मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या विकास निधीमुळे तीर्थक्ष्रेत्र रिद्धपूरचा कायापालट नक्कीच होणार असल्याने जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खर्चाचे पूरक विवरण पत्र सादर केले. या विवरण पत्रामध्ये मागणी क्र. १ बाब ५०५४ मार्ग व पूल यावरील भांडवली खर्च या सदरामध्ये अमरावती जिल्ह्यातील वरुड – गव्हाणकुंड, बहादा, जरुड मांगरुळी, काचुर्ना, हातुर्ना रस्ता वळण रस्त्यासहित (प्रजीमा ४५) किलोमीटर ०/०० ते ३१/७०० व मोर्शी – पाळा, सालबर्डी, डोंगरयावली, दापोरी रस्ता (प्रजीमा ६६) किलोमीटर ०/०० ते १५/६०० (औघोगिग दृष्ट्या महत्वाचा संत्रा प्रक्रिया उद्योग व तीर्थक्षेत्रास जोडणारा रस्ता) या रस्त्याच्या बांधकामाकरिता १४५ कोटी ३२ लक्ष रुपये अंदाजित किमंतीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या मान्यतेचा दिनांक ५ डिसेंबर २०१६ व सन २०१६ – २०१७ करिता ७३ लक्ष ८० हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
   त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रात महानुभवाची काशी म्हणून ओळखल्या जाते, रिद्धपूर तीर्थक्षेत्राशी जोडणारा अमरावती – कठोरा, पुसदा, चांदूरबाजार या रस्त्याची सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यावर ४२ लक्ष ६६ हजार रुपयांची तरतूद या प्रस्तावामध्ये करण्यात आली आहे. मोर्शी – वरुड मतदार संघाच्या विकासात मोठी भर टाकल्याबद्दल तसेच निवडणुकी दरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याबद्दल आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वित्तमंत्री सुधीर मूनगंटीवार, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचे आभार मानले. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाप्रमाणे उपरोक्त निधी मंजूर झाला असल्याने मोर्शी – वरुड व रिद्धपूर मधील जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.