मोईन खान / परभणी :-
जिल्ह्यात नाताळ, नववर्षारंभ व विविध कार्यक्रमांच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) जिल्हयाच्या हद्दीपर्यंत ३१ डिसेंबर २०१६ च्या २४.०० वाजेपर्यंत लागु करण्यात येत आहे. असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे. या कलमान्वये शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगता येणार नाही. कोणतेही क्षारक अथवा स्फोटक पदार्थही बाळगता येणार नाही. प्रवर्तक क्षेपणास्त्रे, द्रवे गोळा करून ठेवता येणार नाही. आवेशी भाषणे / अंगविक्षेप / विटंबनात्मक नक्कल करता येणार नाही. सभ्यता व नितीमत्तेला बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा व वस्तु जवळ बाळगता येणार नाही. व्यक्तीच्या किंवा शवांच्या किंवा त्यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन करता येणार नाही. व्यक्तीच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजून दुखावण्यांच्या उदेशाने वादय वाजविता येणार नाही तसेच असभ्य वर्तन करता येणार नाही. परभणी जिल्हयात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकांणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई करण्यात येत आहे. हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय निमशासकीय कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा, धार्मीक कार्यक‘म, यात्रा विशेषरीत्या दिलेली मिरवणुक व कार्यक्रमास लागु राहणार नाहीत विशेषरीत्या मिरवणुकी बाबत/कार्यक्रमाबाबत परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधिक्षक, परभणी किंवा त्यांनी प्राधिकृत केले पोलीस अधिकारी यांना राहतील असेही जिल्हादंडाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.

Post a Comment