BREAKING NEWS

Sunday, December 18, 2016

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी चे निर्देश



मोईन खान / 
परभणी :-

Image result for शेतकरी
  शेतक-यांच्या आत्महत्यारोखण्यासाठी विशेष मदतीच्या कार्यक्रमाचीमाहिती संबंधित विभागांनी शेतक-यांना द्यावीतसेच या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीकरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

          शेतकरी आत्महत्या प्रकरणांसंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी 1 प्रकरण मदतीस पात्र ठरले, 1 प्रकरण प्रलंबित आहे. तालुका समितीने यासंदर्भातील अहवाल त्वरित पाठवावेत असे निर्देशही  देण्यात आले आहेत. शेतकरी आत्महत्या संदर्भातील प्रकरणे अत्यंत संवेदनशिलपणे हाताळणे आवश्यक असून आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांना त्वरीत मदत मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रकरणाशी निगडीत बाबींची पूर्तता त्वरीत करण्यात यावी. शेतकरी आत्महत्या थांबाव्यात,  शेतक-यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने गावपातळीवर समाजप्रबोधनाचे विशेष कार्यक्रम राबविण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.