मोईन खान /
परभणी : -
अल्पसंख्यांक हक्क दिवस १८ डिसेंबर रोजी साजरा करण्याचे निर्देश असून त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे १८ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात येणार आहे. अल्पसंख्यांकांसाठीच्या १५ कलमी कार्यक्रम तसेच १२ व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत विविध कामांचा आढावा यावेळी घेण्यात येणार आहे.यानिमित्त जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था,मोहल्ला समित्या, येथेही विविध कार्यक्रमांव्दारेअल्पसंख्यांकाचे हक्क, घटनेद्वारे अल्पसंख्यांकांना असलेले अधिकार देशाच्या अखंडतेसाठी आणि विकासासाठी असलेली सामाजिक सद्भावनेची गरज आणि अल्पसंख्यांकांची राष्ट्रीय विकासाच्या मुख्य प्रवाहातील समावेशाची आवश्यकता या बाबीवर समाजाच्या सर्व घटकामध्ये जागृती करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.
परभणी : -

Post a Comment