BREAKING NEWS

Sunday, December 18, 2016

१ जानेवारीला श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन - ह.भ.प. मस्के महाराज यांचे काल्याचे किर्तन - सर्वशाखीय तेली समाज संघटनेचे आयोजन

चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )-



दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संताजी जगनाडे महाराज तैलिक समाज संत यांच्या पुण्यतिथी निमित्याने स्थानिक सर्व शाखीय तेली समाजाच्या वतीने रविवार १ जानेवारी रोजी पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे..
       स्थानिक हनुमान मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणुन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महासचिव डॉ. भुषण कर्डीले हे राहणार असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस तसेच प्रमुख उपस्थिती म्हणुन भाजपा सरचिटणीस रामदास आंबटकर, माजी मंत्री जगदिश गुप्ता, माजी खासदार सुरेश वाघमारे, महाराष्ट्र राज्य जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले, यवतमाळ येथील माजी जि.प. अध्यक्षा सौ. संध्याताई सव्वालाखे, प्रचार्य प्रा. डॉ. जयंत कारमोरे, वर्धा येथील माजी जि.प. सदस्य देवराव पाटील, अकोला संताजी संघटनेचे प्रमोद दांडवे, धामणगाव रेल्वे येथील पं.स. सभापती गणेश राजनकर व स्थानिक सहा. पोलीस निरीक्षक शुभांगी आगाशे आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात सर्वप्रथम सकाळी ९ वाजता ह.भ.प. मस्के महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर कार्यक्रमामध्ये आर्वी नगरपरीषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे तसेच स्थानिक नवनिर्वाचित नगरसेवक देवानंद खुणे, नगरसेविका सौ. कल्पना लांजेवार यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यानंतर १ वाजता महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
     तरी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्थानिक सर्व शाखीय तैलीक समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे..

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.