BREAKING NEWS

Saturday, December 17, 2016

कन्नड दैनिक ‘वार्ताभारती’च्या विरोधात सनातन संस्थेचा हानीभरपाईचा दिवाणी दावा न्यायालयात दाखल !

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याचे प्रकरण
No automatic alt text available.

     फोंडा (गोवा) - सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याच्या हेतूने ‘वार्ताभारती’ या कन्नड दैनिकाने २८ ऑक्टोबर २०१६ या दिवशीच्या अंकात ‘सनातन संस्थेवर बंदी आणण्यात अडचण काय ?’ या मथळ्याखाली मानहानीकारक संपादकीय लेख प्रसिद्ध करून संस्थेची अपकीर्ती केली. याप्रकरणी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी या दैनिकाचे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांच्या विरोधात १० कोटी रुपये मानहानी भरपाईच्या मागणीचा दिवाणी दावा फोंडा, गोवा येथील दिवाणी न्यायालयात दाखल केला आहे.
     सनातन संस्थेचा राष्ट्र आणि धर्म या क्षेत्रांतील कार्याचा नावलौकिक माहिती असतांना मानहानी करण्याच्या हेतूने कर्नाटक राज्यातील मंगळुरू येथून प्रसिद्ध होणार्‍या कन्नड दैनिक ‘वार्ताभारती’चे संपादक, मुद्रक आणि प्रकाशक ए.एस्. पुथिगे यांनी ‘सनातन संस्थेवर बंदी आणण्यात अडचण काय ?’ 
     या मथळ्याखाली संस्थेच्या विरोधात मानहानीकारक संपादकीय लेख दैनिक ‘वार्ताभारती’ च्या २८ ऑक्टोबर २०१६ च्या दिवशीच्या अंकात पृष्ठ ६ वर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे संस्थेची अपरिमित हानी झाली आहे. याप्रकरणी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या कु. दीपा तिवाडी, अधिवक्ता गजानन नाईक, अधिवक्ता नागेश ताकभाते आणि सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांच्या मार्फत दैनिक ‘वार्ताभारती’चे संपादक, मुद्रक आणि प्रकाशक ए.एस्. पुथिगे आणि मालक ‘द कम्युनिटी मिडिया ट्रस्ट’ यांच्या विरोधात फोंडा, गोवा येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या न्यायालयात मानहानीपोटी १० कोटी रुपयांच्या मागणीसाठीचा दिवाणी दावा दाखल केला आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.