मोईन खान / परभणी :-
भारतीय लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने (Every Votes Counts) प्रत्येक मत महत्वाचे या संकल्पनेवर आधारीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, परभणी यांचेवतीने शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा १२ जानेवारी २०१७ रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण ३५ शाळेतील ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सहभागी विद्यार्थ्यांतून परभणी जिल्ह्यातून दोन उत्कृष्ट चित्र मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांना सादर करण्यात आले होते. त्यात कु. सिद्धी भारतराव देसाई, शिवाजी महाविद्यालय, परभणी या विद्यार्थीनीचे चित्र राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेकरिता निवडण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत गट पहिला ९ वी ते १० वी मधून सृष्टी संतोषकुमार चिद्रवार (प्रथम), निहीश कन्हैया शर्मा (द्वितीय), शुभांगी महादू गवळे (तृतीय) यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र देवून व उत्तेजनार्थ म्हणून शुभम पांचाळ, ऋषीकेश संजय लोखंडे, वैष्णवी श्रीपाद जोशी, श्रीनिवास अनंत पांचाळ, निटूरकर वल्लभ प्रदिप, गितांजली मारोती रेंगे, गणेश माधवराव धवन, जगताप गायत्री रामप्रसाद, श्रावणी गजानन वाकडे, वैष्णवी शिवशंकर टाले यांना प्रमाणपत्र व गट दुसरा ११ वी ते १२ वी मधून सिद्धी भारतराव देसाई (प्रथम), ज्योती केशव लगड (द्वितीय) गणेश उद्धव पांचाळ (तृतीय) यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र देवून व उत्तेजनार्थ म्हणून रामेश्वर मुरली पांडुळे, नगमा प्रविण अ. रजाक कुरेशी, पुजा रमेशराव शहाणे, कादगे अपूर्वा बालासाहेब, प्रतिक प्रदिप रूघे, पुष्पा प्रकाश सातसमुंद्रे, सुमेध भगवान बगोट, कलीमा शेख खाजा, सयेदा भिरदोस जातेमा, फिरदोस बेगम शेख युसूफ यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रंजन महिवाल यांचे हस्ते २५ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, महेश सावंत, तहसिलदार परभणी यांचे मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे जिल्हा समन्वयक दिलीप सोनकवडे यांनी परिश्रम घेतले.
Friday, January 20, 2017
सिद्धी देसाई हिच्या चित्राची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेकरिता निवड
Posted by vidarbha on 9:35:00 PM in मोईन खान / परभणी :- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment