तक्रारीत नमुद १२ आरोपी, कारवाई केवळ ५ आरोपींवरच
चांदुर रेल्वे पोलीसांनी गुन्हेगारांना दिली साथ
चांदुर रेल्वे- (शहेजाद खान / विदर्भ ब्युरो चीफ )
परिस्थिती कुठली आहे, याचा विचार न करता, पोलीस आपल्या ठरलेल्या चौकटीत काम करतात. पोलिसांचे कार्य हे समाजातील सर्व लोकांसाठी हितकारक आहे. देशातील सर्वसामान्य जनतेचे रक्षण करणे, समाजातील कुठल्याही उपद्रवी घटकापासून सर्वसामान्य जनतेला आधार देणे, हे खरे पोलिसांचे मूळ कार्य आहे. त्यासाठी पोलिसांनी संवेदनशील राहून लवचिकपणे आपले कार्य करणे गरजेचे असते. मात्र शहरातील पोलीस याऊलट कार्य करत आहे. सर्वसामान्यांना न्याय न देता चक्क गुन्हेगारांचीच साथ देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे रक्षकच त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नसतील तर
सर्वसामान्यांनी कोणाकडे अपेक्षेने पाहतील म्हणजेच आपल्याला अस म्हणाव लागेल कि, दिव्या खालीच अंधार आहे.
सर्वसामान्यांनी कोणाकडे अपेक्षेने पाहतील म्हणजेच आपल्याला अस म्हणाव लागेल कि, दिव्या खालीच अंधार आहे.
![]() |
| कार्यालयात केलेली तोडफोड |
सविस्तरवृत्त असे की, स्थानिक सि.सि.एन. न्युज चॅनलचे संचालक तथा अखील भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल विष्णूआप्पा गवळी (वय 42) हे 2016 वर्षाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी सकाळी कार्यालया मध्ये कामकाज करत असताना आशिष वानखडे, दिनेश राठोड, गाढवे व काही अज्ञात गुंड प्रवृत्तीच्या 10 ते 12 लोकांनी अमोल गवळी यांच्यावर लोखंडी पाईप,काचेचे बॉटल,व फायटर ने प्राणघातक हल्ला केला. सादर घटना पाहताच परिसरातील नागरिक वेळीच धावून आल्यामुळे ते यातून बचावले होते. या हल्ल्यात त्यांचे सहकारी अंकुश खाडे व सागर गावंडे हे ही गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर अमोल गवळी यांचे मोठे बंधू तसेच शहरातील प्रतिष्ठीत नागरीक नगरपरीषदेचे माजी उपाध्यक्ष व आम आदमी पक्षाचे विदर्भ कार्यकारीणी सदस्य नितीन गवळी यांनी या घटनेची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली असता पोलीसांनी गुन्हेगारांना वाचविण्याकरीता नितीन गवळींनी दिलेल़्या तक्रारीला बगल देत बदलून दिले. खरचं पोलीस स्टेशनमध्ये सत्य चालत नाही हे त्या दिवशी सर्वसाधारण माणसांच्या लक्षात आले. पोलीस प्रशासनाने व काही राजकीय नेत्यांच्या पाठबळाने या टोळीवर थातुरमातुर गुन्हे दाखल पोलीस प्रशासनाने केले. अशातच तक्रारीत नितीन गवळींनी अनोळखी हल्ला करणारे असल्यामुळे १०-१२ हल्ले करणारे असल्याचे नमुद केले. मात्र पोलीसांनी याकडे थेट दुर्लक्ष केले. ही गोष्ट पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्मान करणारी आहे. सराईतल्या गुन्हेगारावर व दंगेखोरांवर जो अैक्ट लावण्यात आला तोच अैक्ट नितीन गवळी, अमोल गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांवर लावण्यात आला. चुकीच्या तक्रारीची सहानिशा न करता थेट गवळी बंधुंवर व त्यांच्या सहकाऱ्यांवल गुन्हे दाखल करने म्हणजेच यामध्ये पोलीसांचे हात चांगलेच ओले झाल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. चांदुर रेल्वे पोलीसांची भ्रष्टाचाराची मनसुबे दररोज समोर येत आहे. यामध्ये वरिष्ठापासुन ते साधा पोलीसची शामील असल्याचे बोलले जात आहे. इमानदार वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे..
या हल्ला प्रकरणी नितीन गवळींनी तक्रार देते वेळी ३ हल्लेखोरांना सोडले तर बाकी १०-१२ हल्लेखोर अनोळखी असल्याचे तक्रारीत नमुद केले. तर यांमधील दोन हल्लेखोरांना शहरवासीयांच्या मदतीने पकडण्यात आले. मात्र पोलीसांनी इतर हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच याबद्दल पोलीसांना विचारले असता म्हणतात की, आरोपींची नावे सांगा तरच गुन्हे दाखल करू. म्हणजेच अनोळखी आरोपींची नावे सुध्दा तक्रारकर्त्यानेच शोधुन आणावी व पोलीस घरबसल्या गुन्हे दाखल करणार असा प्रकार होत असतांना दिसत आहे. त्यामुळे शहरातील रक्षकच भक्षक बनले आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे..

Post a Comment