Monday, January 16, 2017
शहरात भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न राजीव गांधी नेत्र हॉस्पीटल व श्रीराम मंदिराचे संयुक्त आयोजन
Posted by vidarbha on 3:36:00 PM in चांदुर रेल्वे- (शहेजाद खान ) - | Comments : 0
चांदुर रेल्वे- (शहेजाद खान ) -
राजीव गांधी नेत्र हॉस्पीटल अैन्ड चैरीटेबल ट्रस्ट, अमरावती व श्रीराम मंदिर, चांदुर रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी शहरात भव्य नेत्रदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सिनेमा चौकातील श्रीराम मंदिरात संपन्न झालेल्या या शिबीराचे उद्घाटन आमदार विरेंद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणुन कृ.उ.बा.स. सभापती प्रा. प्रभाकरराव वाघ, नगराध्यक्ष निलेश सुर्यवंशी, बांधकाम सभापती महेश कलावटे, कृ.उ.बा.स. संचालक राजकुमार जालान, माजी नगरसेवक सुनिल भुत आदींची उपस्थिती होती. या शिबीरामध्ये तखतमल नेत्र चैरीटेबल ट्रस्टच्या चमुंनी कॉम्प्युटराईज एअर कंडिशनर व्हैनमध्ये विशेष तपासणी केली. तसेच आवश्यकता असणाऱ्यांना होलसेल रेटमध्ये चष्मे सुध्दा देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता राजस्थानी समाज व इतरांनी अथक परीश्रम घेतले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment