अवैध वाहतुकीचाही शाहीथाट
शहेजाद खान / चांदूर रेल्वे /-
राज्यात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असतात. त्यामुळे रस्त्यावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यभरात रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. समाजप्रबोधनाच्या माध्यमातून रस्ता
सुरक्षेचे महत्त्व लोकापर्यंत पोहचवण्याचे कार्य या माध्यमातून केले जातेे. राज्यात दरवर्षी सरासरी १२ हजार लोकांचा अपघातामध्ये मृत्यू होतो. तसेच या अपघातामधे मृत्युमुखी पडणाऱ्या ८० टक्के लोकांचे वय हे साधारणपणे १८ ते ३०
वयोगटातील असते. राज्यातील तरुण मनुष्यबळ जर येवढ्य़ा मोठय़ा प्रमाणात अपघातात नष्ट होत असेल तर ती राज्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.
त्यामुळे आता रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना कळावे यासाठी राज्यभर रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. परंतु चांदुर रेल्वे पोलीस प्रशासनाच्या उदासिनतेमुळे हे अभियान केवळ कागदावरच साजरे केल्याचे समजते.
१ जानेवारी ते १५ जानेवारीदरम्यान साजरा केल्या जाणाऱ्या या रस्ता सुरक्षा अभियानात विविध उपक्रम राबविले जातात. मात्र शहरात पुर्णत: शंभर टक्के रस्ता सुरक्षा अभियान साजरा करण्यासाठी स्थानिक पोलीस विभागाला फुरसत नसल्याचे दिसते. केवळ कागदावरच सप्ताह साजरा करण्यात आला. कारण पोलीस विभागाच्या वतीने कोणालाही जागृत करण्यात आलेले नाही. काही दिवसांपुर्वी तुळजापुरजवळ दुचाकींचा अपघात होऊन यामध्ये एक युवक जागीच ठार तर एक जखमी झाला होता. या नंतर पुन्हा चांदुरवाडीजवळ सोमवारी रात्री भयंकर अपघात होऊन यामध्ये दोन युवकांचे प्राण गेले. त्यामुळे हेल्मेट घालण्यासाठी नागरीकांना जागृत करणे गरजेचे होते. कारण हेल्मेट घातल्यानंतर दुखापत होण्याची शक्यता कमी असते. शहर व
परिसरात सर्रासपणे दुचाकी व कारचालक मोबाइलवर बोलत वाहने हाकताना दिसून येत
आहेत. प्रवाशांची वाहतूक करणा-या रिक्षाचालकांकडून क्षमतेपेक्षा जादा प्रवासी बसविले जात आहेत.
www.vidarbha24news.com त्यांच्याकडे पोलीस प्रशासन डोळेझाक करताना दिसतात. शहरातील महाविद्यालयीन रस्त्यावर, बस स्थानक परीसरात दिवसभर ट्रीपलशीट, दुचाकीवर उभे राहून वेडेवाकडे हावभाव करणाऱ्या, धूम स्टाइलने युवकांचा धिंगाणा सुरू असतो. यासोबच या व्यतिरीक्त शहरात अवैध वाहतुकीचा सुध्दा शाहीथाट सुरूच आहे. रस्ता सुरक्षा अभियानाच्या १५ दिवसांमध्ये सुध्दा ही वाहतुक पोलीसांच्या डोळ्यासमोर सुरूच होती. एका खाजगी व्हैनमध्ये तब्बल १५-१६ प्रवासी कोंबल्यासारखे भरून भरधाव वेगाने वाहन चालवितात. यामध्ये प्रवासांच्या जीव धोक्यात असतांनामध्दा केवळ मलीदा लाटण्यासाठी याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे. रस्ता सुरक्षा अभियानाच्या नावावर दोन- तीन लहान थातुरमातुर कार्यक्रम आयोजित करून पोलीस प्रशासन मोकळे झाले होते. मात्र मुख्य जनजागृतीसाठी त्यांना वेळच मिळाला नसल्याचे दिसते. यामुळे शहरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच चालले असुन जीवित व वित्तहानीचे प्रकार घडतच असल्याने शासनाच्या नेमक्या मूळ उद्देशालाच काही प्रमाणात हरताळ फासला जात आहे.


Post a Comment