BREAKING NEWS

Saturday, January 7, 2017

बोगस डॉक्टरांविरूद्ध एफआयआर दाखल करा -जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह

मोईन खान /सैय्यद मुजीबोद्दीन,

यवतमाळ : 



जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांची शोध मोहिम हाती घेण्यात आली. या डॉक्टरांची संपूर्ण माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक तालुकास्तरावर बोगस डॉक्टरांची शोध मोहिम घेण्यात आली. यात 293 बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. त्यांच्याविरूद्ध तालुका आरोग्य अधिकारी यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिल्या.

जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा वावर वाढल्याच्या तक्रारी नागरीकांकडून आल्या होत्या. या डॉक्टरांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. या बाबीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी यांनी बोगस डॉक्टरांची शोध मोहिम राबविली होती. तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या क्षेत्रातील अशा डॉक्टरांच्या रूग्णालयांना भेटी देऊन त्यांच्याकडील कागदपत्रे आणि करीत असलेल्या रूग्णसेवेची माहिती घेतली. यात योग्य पदवी नसणे, नोंदणी नसणे इतर कारणांमुळे त्यांना प्रॅक्टीस करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. या डॉक्टरांनी कारवाईच्या भितीने रूग्णालय बंद केलेले असले तरी येत्या काळात ते पुन्हा येऊन प्रॅक्टीस सुरू करू शकतात. त्यामुळे त्यांची तक्रार तातडीने पोलिसांमध्ये देण्यात यावी.

वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारी पदवी नसणे, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी नसणे, शिक्षणाव्यतिरिक्त दुसऱ्या वैद्यकशास्त्राची प्रॅक्टीस करणे असे प्रकार जिल्ह्यात आढळून येत आहे. या प्रकारांमुळे नागरीकांना त्रास होत आहे, त्यासोबतच काही गंभीर प्रकार समोर येत आहे. त्यांनी केलेल्या औषधोपचारामुळे नागरीकांना गंभीर आजार जडले असल्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर परिणाम होत आहे, त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात 293 बोगस डॉक्टर आढळून आले आहे. त्यांच्या रूग्णालयांची तपासणी करून तालुका आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ त्यांच्याविरूद्ध पोलिसांमध्ये तक्रार करावी. जिल्ह्यात आयुर्वेदिकचे शिक्षण आणि रूग्णांना ॲलोपॅथीची औषधे देण्याचा प्रकार योग्य नाही. ज्या विषयातील शिक्षण घेतलेले असेल, त्यानुसारच रूग्णांवर उपचार होणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई करणे सुरू केले आहे, त्यामुळे त्यांनी आपला व्यवसाय काही काळासाठी बंद केला आहे. असे बोगस डॉक्टर पुन्हा सक्रिय होऊ नये यासाठी त्यांच्याविरूद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.