BREAKING NEWS

Friday, January 6, 2017

गंगाखेडात खाजगी सावकाराला कंटाळुन शेतमजुराची आत्महत्या      * मसनेरवाडी येथिल घटना *

परभणी / मोईन खान /--


गंगाखेड तालुक्यातील मसनेरवाडी येथिल एका शेतमजुराने खाजगी सावकारी कर्जाला कंटळुन आत्महत्या केल्याची घटना घडली.
   या बाबत अधिक माहीती अशी कि,दि.५जानेवारी रोजी सकाळी ११ वा. तालुक्यातील मसनेरवाडी येथिल शेतमजुर बंडु दादाराव मोटे  वय ३५ हा आपल्या पत्नीसह गावातील.एका शेतकर्याच्या शेतात मजुरी साठी गेला असता त्यांच्याकडे खाजगी सावकाराचे कर्ज होते, त्या सावकाराने मागणीचा तगादा लावला होता. यास कंटाळुन शेतमजुराने लिंबाच्या झाडाचे सरपण काढण्याचे  सांगुन लिंबाच्या झाडावर  गेला असता त्याने दोरीने गळ्याला दोर  बांधुन  पत्नीला आरोळी दिली मी चाललोअसे म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी त्याची पत्नी शेताचे काम करीत होती. अचानक लिंबाच्या झाडाकडे पाहीले असता पतीचा मृतदेह दिसुन आला . त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे. या बाबत घटनेची माहीती गंगाखेड पोलीसात दिल्यावरुन घटनास्थळी गंगाखेडचे पोलीस जमादारासह कर्मचार्यांनी धाव घेऊन सदर प्रेत गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात श्वविच्छेदनासाठी दाखल केले असता रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश होत होता.
    या बाबत गंगाखेड पोलीसात गुन्हा नोंद करण्यांची प्रकिया चालु होती.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.