हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता संदीप अपसिंगेकर यांची राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट विधीज्ञ पंढरी युवागौरव’ पुरस्कारासाठी निवड
Posted by
vidarbha
on
6:48:00 AM
in
पंढरपूर (जिल्हा सोलापूर)-
|
‘दैनिक दामाजी एक्सप्रेस’या प्रसिद्ध वर्तमानपत्राच्या वतीने आज पंढरपुरात केला जाणार सन्मान
पंढरपूर (जिल्हा सोलापूर)- हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता संदीप अपसिंगेकर यांची ‘दैनिक दामाजी एक्सप्रेस’ या प्रसिद्ध वर्तमानपत्राच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट विधीज्ञ पंढरी युवागौरव पुरस्कार’साठी निवड झाली आहे. ‘दैनिक दामाजी एक्सप्रेस’च्या पंढरपूर कार्यालयाच्या प्रथम वर्धापनाचे निमित्त साधून मंगळवार, १४ फेब्रुवारी २०१७ या दिवशी पंढरपूर येथील शहर पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या रखुमाई सभागृहात दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी विविध क्षेत्रातल्या प्रतिभावंतांना ‘पंढरी गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याविषयी विभाग प्रमुख भगवान वानखेडे यांनी अधिवक्ता संदीप अपसिंगेकर यांना २ फेब्रुवारीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, पंढरपूरच्या वकिली क्षेत्रात आपण एक अभ्यासू आणि कायद्याचे उत्तम ज्ञान असणारे युवा विधीज्ञ म्हणून सुपरिचित आहात. आपल्या या कार्याची नोंद घेऊन आम्ही आपणास ‘उत्कृष्ट विधीज्ञ पंढरी युवागौरव’ या पुरस्काराने सन्मानीत करत आहोत.
Post a Comment