BREAKING NEWS

Tuesday, February 14, 2017

‘व्हॅलेंटाईन’डे च्या विरोधात जळगाव येथे हिंदु धर्माभिमान्यांची धडक प्रबोधन मोहीम !

महाविद्यालयांकडून उस्फूर्त प्रतिसाद, तर शिक्षणांधिकार्यांनी परिपत्रक काढले !


जळगाव – शहरातील मुलजी जेठा, नूतन मराठा, बबन बाहेती, महिलांचे नंदिनीबाई बेंडाळे आणि एस्.एन्.डी.टी., रायसोनी महाविद्यालय, आय.एम्.आर्., देवकर, तसेच बांभोरी येथील अभियांत्रिकी आदी महाविद्यालयांसहित उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे ‘व्हॅलेटाईन डे’च्या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून धडक प्रबोधन चळवळ राबवण्यात आली.
या वेळी वरील महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांना ‘व्हॅलेटाईन डे’ निमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी निवेदन देण्यात आले. महाविद्यालयात त्यासाठी परिपत्रक काढण्यात येऊन तसेच भारतीय संस्कृतीनुसार या दिवशी मातृ-पितृ दिवस साजरा करून संस्कृती रक्षणाचे आवाहन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना युवा पिढीचे राष्ट्रांतर आणि धर्मांतर करणारा हा दिवस साजरा न करण्याचे प्रबोधनात्मक हस्तपत्रक या वेळी देण्यात आले. उच्च माध्यमिक शिक्षणाधिकार्यांधनी आज जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत शासनाच्या वतीने याविषयीचे परिपत्रक जारी करण्यात आल्याची माहिती दिली.
या वेळी जय भवानी ग्रूपचे श्री. येसाजी चव्हाण, सर्वश्री राहुल तळेले, मयुर भदाणे, आशिष गांगवे, योगेश ठाकुर, हर्षल, अधिवक्ता प्रितम पाटील, यश किंगरानी, कु. रागेश्री देशपांडे, श्रेयस पिसोळकर यांच्यासह अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.