चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-
आज रविवार १२ फेब्रुवारीला दुपारी २ ते ५ थायराईट चेकअप शिबिराचे आयोजन केले आहे. बुधवार १५ फेब्रुवारी सायंकाळी ७ ते १० ‘ व्यसनमुक्ती सम्राट ‘ मधुकर खोडे(इसापुरकर) यांचे किर्तन होणार आहे. गुरुवार १६ फेब्रुवारीला दुपारी २ ते ५ रक्त तपासनी व रक्तदान शिबिर आयोजीत केले असुन बालाजी ब्लड बँक, अमरावती यांचे मोलाचे सहकार्य राहणार आहे. सायंकाळी ७ ते १० हभप सोपान महाराज काळपांडे(मुर्तीजापुर) यांचे जाहिर राष्ट्रीय किर्तन होणार आहे. शुक्रवार १७ फेब्रुवारी वैद्यकिय संघटना, चांदूर रेल्वे, गेट वे लाईफ हॉस्पीटल व मराठा फ्रेंड्स , विजय कॉलनी, रूख्मिनी नगर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी २ ते ५ भव्य रोग निदान शिबिर आयोजित केले आहे. सायंकाळी ७ ते १०वा. मुंबईचे सुप्रसिध्द गायक रवींद्र साठे व सोनी टिव्ही इंडियन ऑयडॉल-२ चे प्रसिध्द गायिका यशश्री भावे (पाठक) यांचे ' सुगम संगीत ' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवार १८ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता संत गजानन महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणुक निघणार असुन यामध्ये ब्रम्हाडनायक ढोल पथक, चांदूर रेल्वे, घुईखेड चे बेंडोजी महाराजांचा रथ, श्रीराम वारकरी संप्रदाय मंडळ, ब्राम्हणवाडा पुर्व, महाविर क्षिरसागर(खामगाव) यांचे पथ रांगोळी यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. दुपारी २ ते ५ महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाचा सर्व चांदूरवासीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केल आहे.
या महोत्सवाकरीता संजय सोनवाल, दिलीप ढोक, मनोज शिंदे, अनिल गायकवाड, जितु गोरे, रवींद्र चौधरी,प्रशांत दाऊतपुरे, किशोर क्षिरसागर, सुदर्शन जैन, बंडु मुंधडा, कन्हैय्यालाल वाधवानी, संतोष मुंदडा, राम मोटवानी, समिर बोडके, शिट्टू सुर्यवंशी, राजु वऱ्हाडे वानंद खुने, अब्बास बोहरा, जगदिश इचपाडे, बंटी माकोडे, मधुकर हरडे, मनिष राय, शुभम भारूका, वैभव चुकेकर, बाळु कडू, राजेश अजमिरे, राजु जयसिंगपुरे, अशोकभैय्या जयस्वाल, प्रफुल्ल कोकाटे, अमोल गवळी, पिंटू बोबडे, पिंटू चंदाराणा, संतोष घाटोळ, डॉ.अक्षय माळोदे, डॉ.सागर वाघ, रवि चांदोरे, गोपाळ बकाले, बाळासाहेब देशमुख, संतोष निमजे यांच्यासह समस्त चांदूर नगर वासीय परिश्रम घेत आहे.



Post a Comment