BREAKING NEWS

Monday, February 13, 2017

१४ फेब्रुवारीला आई-वडिलांचे पूजन करण्याविषयी सोलापूरच्या शिक्षणाधिकार्‍यांनी काढलेले पत्रक शिक्षणमंत्र्यांकडून रहित

सरकारचा हिंदूंना अचंबित करणारा निर्णय !

परिपत्रक काढणार्‍या शिक्षणाधिकार्‍यांचे निलंबन



सोलापूर – येथील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तानाजी घाडगे यांनी भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना १४ फेब्रुवारीला फाशी झाली असल्याने क्रांतीकारकांच्या प्रतिमांचे पूजन अन् आई-वडिलांचे पूजन करण्याचा दिवस म्हणून साजरा करा, अशा आशयाचे परिपत्रक सर्व शाळांना पाठवले होते. या परिपत्रकातील क्रांतीकारकांच्या फाशीचा दिनांक चुकीचा असणे आणि आई-वडिलांचे पूजन करा, असा आदेश काढणे, या सूत्रांवर आक्षेप घेत शिक्षणशास्त्राचे अभ्यासक (?) किशोर दरक यांनी हा आदेश रहित करण्याची मागणी केली. तसेच अन्यही उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्याने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हे परिपत्रक मागे घेत शिक्षणाधिकारी घाडगे यांचे निलंबन केले आहे. जगभर १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो.
शिक्षणाधिकारी श्री. तानाजी घाडगे यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना १४ फेब्रुवारीला फाशी झाली. या दिवशी विद्यार्थ्यांनी क्रांतीकारांच्या प्रतिमांचे, तसेच पालकांचे औक्षण करावे, सोबतच पालकांनी जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणासाठी आर्थिक साहाय्य करावे.
सरकारी माहितीच्या आधारे भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव या क्रांतीकारकांना २३ मार्च १९३१ या दिवशी फाशी देण्यात आली, असा इतिहास आहे. परिपत्रकात दिनांकाची चूक आणि आई-वडिलांचे पूजन करा, अशा आवाहनाला काहींनी तुघलकी आदेश म्हणत आक्षेप घेतला; मात्र परिपत्रकातून घाडगे यांनी उद्देश स्पष्ट करतांना लिहिले आहे की, क्रांतीकारकांच्या कार्याचे स्मरण आणि आई-वडिलांविषयी मुलांमध्ये आदर निर्माण होईल. या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना शाळेत बोलवावे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी क्रांतीकारकांच्या प्रतिमांचे पूजन करून पालकांचे औक्षण करावे. अशा प्रकारच्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना देशभक्तीची आणि आपल्या पालकांच्या कष्टाची जाणीव होईल; मात्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परिपत्रक रहित केले आहे. घाडगे यांचे आदेश शिक्षण विभागाने रहित केल्याची माहिती शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी दिली.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.