चांदूर रेल्वे / शहेजाद खान -
शालेय शिक्षण घेतांना वर्षांनुवर्षे विद्याथ्र्यांचे पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. त्यामुळे या ओझ्याखाली विविध आजाराने विद्यार्थी ग्रासला आहे. या दप्तराचा भार कमी करण्यासाठी स्थानिक बापुसाहेब देशमुख शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने अनोखा उपक्रम राबविला.या शाळेचे निलेश चाफलेकर या शिक्षकाने इयत्ता सातवीचे घटक चाचणी व सत्र परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार एकच संयुक्त पुस्तक तयार करून या सर्व पुस्तकाचा भार केवळ ३०० ग्रॅमवर आणला. या अभिनव उपक्रमामूळे विद्याथ्र्यांना अभ्यास करणे सोपे झाले असुन नवीन पुस्तक निमिर्तीचा आनंद विद्याथ्र्यांनी लुटला.
या अनोख्या कार्यशाळेचे उद्घाटन चांदूर रेल्वे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याचे पुजन व पुष्पहार अर्पण करून केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार प्रा.रवींद्र मेंढे, पत्रकार गुड्डू शर्मा, चांदूर रेल्वे तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रदीप तळोकार, प्राचार्य विलास मायंडे, पर्यवेक्षक विनोद उतखेडे, किशोर वाघ आदींची उपस्थिती होती. सहा.शिक्षक निलेश चाफलेकर यांना विद्याथ्र्यांच्या पाठीवरच्या दप्तराचा भार कमी करण्याची कल्पकता सुचली. ही बाब त्यांनी प्राचार्यांना सांगीतली. प्राचार्य मायंडेनी त्यांना प्रोत्साहन दिले. श्री चाफलेकर यांनी यासाठी वर्ग ७ वीचे काम हाती घेतले. वर्ग ७ वीला सात विषय आहे. विद्याथ्र्यांचे दररोज ९ तासीका होतात. त्यासाठी त्यांना सर्व विषयाचे पुस्तके आणावे लागते. त्यामुळे त्यांच्या दप्तरांचा भार वाढतो. तो भार कमी करण्यासाठी चाफलेकर नी सातवीचे प्रत्येक विषयाचे प्रथम व व्दितीय घटक चाचणी तसेच प्रथम व व्दितीय सत्र परीक्षा या प्रमाणे अभ्यासक्रमाचे युनिट वेगळ केले. प्रथम, व्दितीय घटक चाचणी तसेच प्रथम व व्दितीय सत्राप्रमाणे त्यांचे चार पुस्तकाचे संच तयार केले. यामूळे विद्याथ्र्यांना घटक व सत्रानुसार अभ्यास करणे सोपे झाले आणि झालेल्या अभ्याक्रमाच्या पुस्तकाचा अतिरीक्त भार ही कमी झाला. या प्रमाणे वर्ग १ ते ९ पर्यंतच्या अभ्यासक्रमाचे एकच संकलित पुस्तक तयार करता येणार आहे. वर्ग सातवीचे संकलित पुस्तके तयार करण्याची कार्यशाळा शाळेत घेण्यात आली. यावेळी विद्याथ्र्यांनी आपआपले पुस्तक स्वतः तयार केले. तर निलेश चाफलेकर यांनी तयार केलेले सातवीच्या अनोखो चार संकलित पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांनी या अभिनव उपक्रमाची प्रशंसा करीत हा स्तुत्य उपक्रम राज्य शासन स्तरावर राबविल्या जावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. याप्रसंगी प्राचार्य मायंडे यांनी आपले विचार व्यक्त केले. या पुस्तक निर्मितीची प्रत्यक्ष पाहणी मान्यवरांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक किशोर वाघ यांनी तर संचालन समीर ढेकेकर व आभार अभय देशमुख यांनी मानले. यावेळी बापुसाहेब देशमुख शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment