BREAKING NEWS

Wednesday, February 15, 2017

आदिवासी विकास मंडळातर्फे तूर खरेदी

यवतमाळ-

आदिवासी उपयोजना क्षेत्रात राष्ट्रीय कृषि विपणन महासंघ (नाफेड) साठी तूर खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळास अभिकर्ता म्हणून नेमण्यात आले आहे.
यासाठी प्रादेशिक कार्यालय, यवतमाळ अंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय, कळंबचे खरेदी केंद्र म्हणून लोहारा येथे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी आणावा. विक्रीसाठी माल आणताना शेतकऱ्यांकडून अद्ययावत नमूद पिकपेरा असलेला सातबारा तसेच पिकपेरा नमूद नसल्यास तलाठ्याचे पेराप्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तुरीचा दर हा प्रतिक्विंटल पाच हजार 50 रूपये एफएक्यू मालासाठी ठेवला आहे. शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुकची छायाप्रत आणि मोबाईल क्रमांक अशी माहिती देणे आवश्यक आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक यांनी केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.