माझा मुलगा अमित हॉस्पिटलमध्ये होता म्हणून मला प्रचारात उतरता आलं नाही. पण आता तो ठीक आहे
अमित आजारी असल्यामुळे मी प्रचाराला उतरू शकत नव्हतो पण तरीही उमेदवारांनी जोरात प्रचार सुरु ठेवला, याबद्दल त्यांचे अभिनंदन
आज शिवसेना भाजपमध्ये जी भांडणं सुरु होत आहे त्याचा महापालिकेशी काय संबंध? शहरं दिवसेंदिवस बकाल होत आहेत त्यावर कोणी बोलत नाही
नोटबंदीनंतर पंतप्रधान म्हणाले की नवीन वर्षात नवा भारत दिसेल पण कुठे आहेत तो बदल?
२०१४ च्या निवडणुकीत भाजपने प्रत्येक उमेदवाराला १ कोटी दिले होते आज उत्तरप्रदेशात भाजपचे ४०० उमेदवार उभे आहेत मग ४०० कोटी कुठून आले?
नोटबंदीमुळे अनेक कंपन्या बंद पडल्या, हजारो लोकं बेरोजगार झाले, रांगेत अनेक लोकं गेली. हे कोणी का बोलत नाही?
भाजपा म्हणते पारदर्शी कारभार देऊ, पण कसा, मग नोटबंदी नक्की का केली?खोट्या नोटा कालच पकडल्या गेल्या?मग काय बदल झाला
भाजपचा पार्टी विथ डिफरन्सचा अर्थ एवढाच की भाजपकडे पैसा आहे आणि तुमच्याकडे नाही,हाच डिफरन्स
नुसती पॅकेजची आश्वासन द्यायची पण पैसे आहेत का सरकारकडे? महाराजांचा जो पुतळा उभारणार ते म्हणतात त्यासाठी ८ हजार कोटी लागतील. आहेत का?
नाशिकच्या ५ वर्षांच्या काळात १८ महिने आयुक्त नव्हता तरीही आम्ही कामं सुरु ठेवली
खड्डे बुजवण्याचं मुंबई महापालिकेचं बजेट आहे दर वर्षांला १०० कोटी. हे जगात फक्त मुंबईत असेल
आम्ही नाशिकमध्ये मुकणे धरणातून थेट पाईपलाईन टाकतोय. ज्यामुळे पुढची ४० वर्षे पाण्याची टंचाई जाणवणार नाही
गेल्यावर्षी पाऊस पडल्यावर चॅनेलवाले मुंबई ठाणे पुण्यातील रस्त्यातील खड्ड्यांच फुटेज शूट करून गेले, त्यांना नाशिकमध्ये एकही खड्डा सापडला नाही
नाशिकमधलं बोटॅनिकल गार्डनला टाटा ट्रस्टने सुरुवातीला ३ कोटी दिले पण आम्ही केलेलं कामं पाहून त्यांनी १४ कोटी दिले
नाशिकमधलं बोटॅनिकल गार्डनचं काम पाहून रतन टाटा म्हणाले 'वेल डन राज'
महाराष्ट्रातल्या कुठल्यातरी एकही शहरांत बोटॅनिकल गार्डनसारखं एकतरी सुंदर उद्यान आहे का?
निवडणुकीच्या काळात फक्त जाहिराती आणि सोशल मीडियाचा वापर करून निवडणुका जिंकल्या जाणार असतील तर मग काय उपयोग विकासकामं करून?
१९५२ साली जन्माला आलेला भाजपाला स्वतःचे उमेदवार मिळत नाहीत म्हणून दुसऱ्यांच्या मुलांना पळवतात, हिमंत असे

Post a Comment