जि.प.निवडणूक मतदान केंद्राधिकारी , कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण उत्साहात
चांदूर रेल्वे / शहेजाद खान -
ते आज (ता.१२) स्थानिक अशोक टॉकीज येथे आयोजित जि.प.सार्वत्रिक निवडणूक २०१७ च्या मतदान केंद्राधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण वर्गाला मार्गदर्शन करतांना बोलत होते. या प्रशिक्षण वर्गाला निवडणूक निरिक्षक तथा अतिरीक्त जिल्हाधिकारी श्री तिटकरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार बी.ए.राजगडकर, नायब तहसीलदार दिनेश बडीये आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक निरिक्षक श्री तटकरे यांनी कर्मचाऱ्याना मार्गदर्शन केले. यावेळी नायब तहसीलदार श्रीकांत विसपुते यांनी पॉवर पॉईन्ट प्रझेन्टेशनव्दारे निवडणूक मतदान प्रक्रियेची माहिती दिली. तलाठी यांनी निवडणूक कर्मचारीना ‘ ईव्हीएम ‘ हाताळयांची माहिती दिली.तर मतदान केंद्राधिकारी व कर्मचारीयांनी ‘ ईव्हीएम ‘चे प्रात्यक्षिक करून पाहीले. या प्रशिक्षण वर्गाला नायब तहसीलदार पळसकर, मंडळ अधिकारी लंगडे, देशमुख, तलाठी वंजारी, देशमुख, मलमकर, अमोल ठवकर, श्री.इंगळे सह सर्व महसुल अधिकारी, कर्मचाऱ्यानसह मतदान केंद्राधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment