मोईन खान / परभणी : -
आघाडी शासनाने जलसिंचनासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. प्रकल्प अर्धवट ठेवून निधी लाटला आणि सिंचनाचा बट्याबोळ केला. असे सांगत आमच्या शासनाने लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान योजना हाती घेतली मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणे हीच लोकनेते गोपीनाथ मुंढे यांना खरी श्रध्दांजली ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यानी के ले. ते परभणी तालुक्यातील पिंगळी येथे जि.प. , पं.स. प्रचार सभेत बोलत होते.यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर,ज्ञानोबा मुंढे, जिल्हाध्यक्ष अभय चाटे , विजय गव्हाणे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री पुढे म्हणौले देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षाचा कालावधी उलटला तरी अन्न,वस्त्र,निवारा या सारखे प्रश्न दोन्ही कॉग्रेसला सोडविता आले नाही. आम्ही सत्तेवर आलो तेव्हा राज्यात मोठा दुष्काळ परिस्थीती होती तीजोरीत खडखडाट होता, कर्जाचा डोंगर सहन करत भरीव मदत केली. जिल्हयातील स्थानीक राजकारणाचा उल्लेख करत शिवसेना व दोन्ही कॉग्रेस यांच्यात होत असलेली छुपी युती ही अभद्र होत अस्ल्याचे सांगत भाजपा हाच एक पर्याय आहे. दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून १३ हजार कोटी रुपए दिले. अन्न सुरक्षा योजना यातून शेतकºयांना दिलासा दिला. ४ हजार गावे दुष्काळमुक्त केली तसेच दोन वर्षात १२ लाख हेक्टर जमीन संरक्षीत सिंचनाखाली आणली असून कृषिपंपासाठी असलेली प्रतिक्षा यादी संपवली आहे. शेतीसाठी विज उपलब्ध करून दिली जाईल असे सांगत मराठवाडयातील पाणी प्रश्न मिटवून खºया अर्थाने गोपीनाथ मुंढे यांना श्रध्दांजली देवू असे सांगीतले. पाणी पुरवठा मंत्री बबबनराव लोणीकर यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडत शोले मधील आसराणीची भूमिका सांगत आधे इधर आधे उधर बाकी मेरे पिछे असे सांगत खिल्ली उडवली.
दरम्यान मुख्यमंत्री यांनी इथून जवळच असलेल्या शहीद जवान बालाजी अंभोरे यांच्या कुटुंबियाचे सात्वन न करता लातूरकडे रवाना झाले यामुळे मुख्यमंत्र्याना निवडणूक प्रचारासाठी वेळ आहे पण सात्वन करण्यासाठी नाही या बद्दल नाराजीचा सुर अनेकानी व्यक्त केला.
Post a Comment