BREAKING NEWS

Sunday, February 12, 2017

मुंधडा महाविद्यालयात 'आयुर्वेद व निरोगी आरोग्य'वर कार्यशाळा

चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-




स्थानिक मदनगोपाल मुंधडा कला, वाणिज्य, व अशोक विज्ञान महाविद्यालयात आयुर्वेद व निरोगी आरोग्य, यावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच क्रीडा व रंजन विभागाच्या द्वारे करण्यात आले होते.
या कार्यशाळेची सुरुवात संत गाडगेबाबा यांना वंदन करून करण्यात आली. क्रीडा व रंजन विभाग प्रमुख डॉ. अलका करणवाल यांनी ह्या कार्यशाळेचे महत्व आपल्या प्रास्ताविकातून मांडले. त्या म्हणाल्या की, कोणतीही उपचार पध्दती ही जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण आपल्याला त्याचा निश्‍चित फायदा होतो. आयुर्वेद तर ही भारतीय प्राचिन उपचार पध्दती आहे. यासोबतच त्यांनी कार्यशाळेला लाभलेल्या मुख्य वक्त्यांचा परिचय करून दिला व उपस्थित सर्वांचे विभागाच्या वतीने स्वागत केले.
या कार्यशाळेसाठी अमरावती येथील आयुर्वेद उपचार तज्ज्ञ डॉ. वैशाली गुल्हाणे प्रमुख वक्ता लाभल्या होत्या. कार्यशाळेच्या विषयाच्या अनुषंगाने डॉ. गुल्हाणे यांनी सविस्तर आयुर्वेदातील महत्वाच्या उपचार पध्दती तसेच प्रक्रियेविषयी अत्यंत मोलाची माहिती दिली. आपण शहरात अथवा खेडयात कुठेही असलो तरी हरकत नाही आयुर्वेद पध्दती के वळ शहरातील लोकांनाच लागू आहे, असे ठरवणे चुकीचे आहे. म्हणून ह्याची स्पष्ट माहिती असावी, असे त्या म्हणाल्या. दररोज सकाळी चहा घेण्यापेक्षा विविध भाज्या व काही इतर जीवनद्रव्य असलेले घटक यांचा रस आपण घेऊ शकतो. अशाप्रकारे हया सवयी मोडल्या जाऊ शकतात. त्या पुढे म्हणाल्या की, उत्तम आरोग्यासाठी तीन गोष्टी त्यामध्ये डिवायएस म्हणजे डायट, योगा, व झोप ह्या तिन्ही बाबी वर दैनंदिन जीवनामध्ये नियंत्रण ठेवल्यास आपण निरोगी जीवन जगू शकतो. त्यासोबतच सकाळी नियमित फिरायला जाणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यासोबतच गाजर, बीट, व टमाटर यांचा रस घेतल्याने पित्त व अपचन या सारख्या व्याधींचा त्रास होणार नाही, असे ठामपणे सांगितले.
    कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले प्राचार्य डॉ. जयंत कारमोरे यांच्यासह प्रभारी प्राचार्या डॉ. सुलभा कडु, डॉ. हेमंत गुल्हाने यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेचे संचलन कु. श्वेता अतकरी हिने तर आभार प्रदर्शन रोषन मार्बते याने केले. दिवसभर चाललेल्या कार्यशाळेला प्राध्यापक, कर्मचारीवृदांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.