BREAKING NEWS

Wednesday, March 15, 2017

शेतकऱ्याच्या घराला आग लागुन ४५ क्विंटल कापुस खाक - टेंभुर्णी येथील घटना. २.६२ लाखांचे नुकसान

चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-


तालुक्यातील टेंभुर्णी येथील एका शेतकऱ्याच्या घराला आग लागुन ४५ क्विंटल कापसासह घरातील वस्तु जळुन एकुण २ लाख ६२ हजारांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजता घडली.


       चांदुर रेल्वे येथुन ५ कि.मी. अंतरावर असलेल्या टेंभुर्णी येथील  शेतकरी  बंडुपंत भाऊरावजी शेळके यांच्या घराला मंगळवारी अचानक शॉर्टसर्कीटने आग लागली. आग लागताच गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा पुरेपुर प्रयत्न केला तसेच स्थानिक नगर परीषदेच्या अग्नीशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले



. अग्नीशमन दलाची गाडी येताच त्यावरील कर्मचाऱ्यांनी जवळपास १ तासांत आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र घरात ठेवलेला ४५ क्विंटल कापसासह टि.व्ही. व घरातील इतर संपुर्ण साहित्य जळुन खाक झाले. तसेच घराचेही नुकसान झाले आहे. 


यामध्ये एकुन २ लाख ६२ हजारांचे नुकसान झाले आहे. येत्या १४ मे ला बंडुपंत शेळके यांचा मुलगा प्रफुल्ल शेळके याचा विवाह होणार आहे. व त्यासाठीही आणलेले काही साहित्य या आगीत जळले. 



घटनेचा पंचनामा चांदुर रेल्वे पोलीसांनी केला आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.