BREAKING NEWS

Thursday, March 16, 2017

गर्भलिंग निदान केंद्राची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस

 वाशिम / महेंद्र महाजन -

कोणत्याही नोंदणीकृत, अनोंदणीकृत केंद्रातील डॉक्टर किंवा अन्य कोणी व्यक्ती, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष गर्भलिंग निदान करीत असेल किंवा गर्भलिंग निदानासाठी प्रवृत्त करीत असेल अशा व्यक्तीची माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या सूचनेनुसार जनसामान्यांपर्यंत पीसीपीएनडीटी कायद्याची माहिती पोहोचवावी, यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कक्षात घेण्यात आलेल्या या पत्रपरिषदेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, विधी सल्लागार ॲड. राधा नरीवाल आदी उपस्थित होते.

डॉ. पटेल यांनी, गर्भधारणा पूर्व आणि प्रसवपूर्व निदान यंत्रे हा लिंग निवडीस प्रतिबंध कायदा १९९४ पासून अस्तित्वात आला आहे. मुलींचे कमी होत असलेले प्रमाण आणि स्त्रीभृण हत्या थांबविणे आणि गर्भलिंग परिक्षणास प्रतिबंध घालण्यास मदतगार ठरला आहे. या कायद्यानुसार सर्व सोनोग्राफी मशिनला मशीन रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट देण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४४ मशिन कार्यरत आहेत. सर्व केंद्रांना गर्भवती महिलांचे एफ फॉर्म ऑनलाईन भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. राज्यातील काही ठिकाणी गर्भलिंग निदानाच्या घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर १५ मार्चपासून सर्व सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांची प्राधिकारीमार्फत तपासणी करण्यात येणार आहे.

गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांची माहिती देणाऱ्या खबऱ्यास २५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी १८०० २३३ ४४७५ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.  तसेच १०४ या टोल फ्री क्रमांकावरही याबाबतची माहिती देता येईल. www.amachimulgi.gov.in वरही जिल्ह्यातील बेकायदा अनोंदणीकृत असलेल्या केंद्रांबाबत तक्रार नोंदविता येईल, असे डॉ. पटेल यांनी यावेळी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर यांनी यावेळी सावित्रीबाई फुले कन्या योजनेविषयी माहिती दिली. ॲड. नरीवाल यांनी गेल्या तीन वर्षामध्ये पीसीपीएनडीटी अंतर्गत करण्यात आलेल्या डीकॉय केसेस व मुलींचा जन्मदर याविषयी माहिती दिली.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.