BREAKING NEWS

Sunday, April 30, 2017

आमदार डॉ.अनिल बोंडेंच्या नेतृत्वात दारूमुक्ती एल्गार - महिलांच्या आंदोलनातून देशी दारूचे दुकाने झालीत सीलबंद

वरुड (अमरावती) : -




राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटरच्या आतमध्ये असलेली सर्व देशी दारू आणि बियर बारची दुकाने हटविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर वरुड तालुक्यातील केवळ ४ देशी दारूचे आणि मलकापूर व लोणी येथील एक बियर बार अशी केवळ ६ दुकाने शिल्लक राहिली आहेत, अशा स्थितीत सुरु असलेली दुकाने सुद्धा बंद करण्याच्या मागणीसाठी आज शनिवार २९ एप्रिल २०१७ रोजी नगरपरिषद पदाधिकाऱ्याच्या पुढाकाराने मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांचे नेतृत्वात वरुड शहरातील दिनही देशी दारूच्या दुकानांसमोर दारूमुक्ती जनसत्याग्रह आंदोलन छेडण्यात येऊन दोन्ही दुकानांना सील लावण्यात आले.*
     *सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गेल्या १ एप्रिलपासून राष्ट्रीय व राज्य महामार्गापासूनची ५०० मीटर जवळील दारूची दुकाने बंद झाली आहेत. वरुड शहरात २ देशी दारूची दुकाने शिल्लक असलेल्या दुकानांसमोर यात्रेसारखी गर्दी होत आहे. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना विशेषत: महिला व मुलींचे जीवन असुरक्षित आणि धोकादायक झालेले आहे. परिसरातील लोकांना त्रास असह्य झालेला आहे. सर्व मातृशक्तीच्या पुढाकाराने शहरातील शांतता व सुव्यवस्थेच्या दुष्टीने दिनही देशी दारू दुकानांसमोर दारूमुक्ती जनसत्याग्रह आंदोलन करून लोकांचा विनाश हटवा, दारूला समाजातून हटवा या उद्देशातून देशी दारूची दुकाने शहराबाहेर हद्दपार करण्यात यावे, या मागणीकरिता हे दारूमुक्ती जनसत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले. या जनसत्याग्रह आंदोलनाचे नेतृत्व आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले.*
   *यावेळी राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधिकारी आर.के.तायकर, महसूल प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार कमलाकर देशमुख व पोलिस प्रशासनाच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक चित्तरंजन चांदुरकर या अधिकाऱ्यांचे स्वागत करून लावण्यात आलेले सील पुन्हा तोडता कामा नये, असा इशारा सुद्धा आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी यावेळी दिला. याप्रसंगी नगरपरिषद वरुडच्या नगराध्यक्षा स्वातीताई आंडे, मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सूतगिरणीच्या अध्यक्षा डॉ.वसुधाताई बोंडे यांच्यासह अनेक महिलांनी दोन्ही दुकानांना सील लावून टी कायमची बंद कार्यात यावी अशी मागणी केली.*
      *याप्रसंगी पंचायत समिती सदस्या व भाजपाच्या महिला तालुकाध्यक्षा सौ.अंजलीताई तुमराम, वरुड न.प.उपाध्यक्ष किशोर भगत, भाजपा तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे,  न.प. गटनेता नरेंद्र बेलसरे, सभापती हरीश कानुगो, योगेश चौधरी (वकील), राजू सुपले, मनोज गुल्हाने, सौ.नलिनीताई रक्षे, पुष्पाताई धकीते, नगरसेविका सौ.नलिनीताई रक्षे, सौ.पुष्पाताई धकीते, नगरसेविका सौ.रेखाताई काळे, सौ.मंदाताई आगरकर, सौ.शुभांगीताई खासबागे, सौ.छायाताई दुर्गे, सौ.सुवर्णाताई तुमराम, सौ.अर्चनाताई आजनकर, सौ.भारतीताई माळोदे, स्वीकृत सदस्य संतोष निमगरे, प्रितम अब्रुक, सुरेश दुर्गे, राजेंद्र काळे, नंदकिशोर आजनकर, भारत खासबागे, धनराज राऊत, सागर मालपे यांच्यासह शेकडो महिला व पुरुष या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी वरुड पोलिसांनी चोख असा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी देण्यात आलेल्या विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.*

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.