वरुड (अमरावती) :
दि.२९/४/२०१७ रोज शनिवारला अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासन वनपरीश्रेत्र कार्यालय वरुड तर्फे संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यामातून संपूर्ण बायोगैस कनेक्शन व कृषी विभाग मार्फत तालुक्यातील ४ गावातील ९ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप तहसील कार्यालयाच्या सभागृहात मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ.अनिल बोंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ. अनिल बोंडे तसेच प्रमुख अतिथी म्हणून वरुड – मोर्शीचे उपविभागीय अधिकारी मनोहरराव कडू, वरुडचे तहसीलदार आशिष बिजवल, मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सूतगिरणीच्या अध्यक्षा डॉ.वसुधाताई बोंडे, तालुका कृषी अधिकारी उज्वल आगरकर, उपकोषागार अधिकारी कृष्णराव बढीये, भाजपा तालुकाध्यक्ष व नगरसेवक देवेंद्र बोडखे, वनपरीश्रेत्र अधिकारी दादाराव काळे यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
२५ टक्के रक्कम भरून अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील वनविभागाच्या अख्यातीलगत असणाऱ्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या ७ उपसमितीतील कारली, वाई, झटामझिरी, गव्हानकुंड, पंढरी, महेंद्री आणि रवाळा येथील एकूण ७७ लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बायोगैस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. स्वच्छ उर्जा व निर्मळ पर्यावरणाश्रती लाभार्थ्यांनी कटीबद्ध राहावे, धुरामुळे आपणास वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे स्वच्छ उर्जा हि मानवाची व पर्यावरणाची गरज आहे, तसेच कृषी खात्यातील अधिकारी – कर्मचाऱ्यांनी गाव मुक्काम करून पुढील येणाऱ्या हंगामाची शेतकऱ्यांना योग्य माहिती पेरणीबाबत अवगत करावे, जेणे करून शेतकऱ्यांची फसगत होणार नाही असे मत आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी व्यासपीठावरून बोलतांना व्यक्त केले. वनपरीश्रेत्र अधिकारी दादारावजी काळे यांनी संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या कार्याची प्रशंसा करून असेच सहकार्य भविष्यात प्राप्त होवो असा आशावाद व्यक्त केला.
वरुड तालुक्यातील वनविभाग व वनव्यवस्थापन समिती मार्फत सन २०१३-१४ वर्षात ९७ लाभार्थी तर २०१४-१५ - १०२ व २०१५-१६ – १२३ तसेच २०१६-१७ चालू वर्षात एकूण १५८ असे एकूण आजपर्यंत ४८० अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना बायोगैस कनेक्शनचे वाटप करण्यात आले आहे. त्यासोबतच केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत, याच दरम्यान वरुड तालुक्यातील पळसवाडा येथील शेतकरी सुनील वासुदेवराव पावडे, जरुड येथील मोतीरामजी नारायणराव सिनकर , सौ.पुष्पाबाई मोतीरामजी सिनकर तसेच फत्तेपूर येथील देविदास कृष्णराव नारंगे, लंकेश भगवान चव्हाण, सुधीर संकेत चव्हाण व रोषणखेडा येथील नरेश महादेवराव फुले, हिराचंद पांडुरंग बोराडे, सौ.रेखाताई रुपराव खोडस्कर या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वनविभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.किशोर तडस तर प्रास्ताविक वनपरीश्रेत्र अधिकारी दादाराव काळे यांनी केले. ग्रीन आर्मीचे सदस्यत्व वनव्यवस्थापन समिती सोबत संपर्क करून नागरिकांनी घ्यावी आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी सक्रियतेने पार पाडावी असे हि यावेळी सांगण्यात आले.*

Post a Comment